Girish Mahajan politics: मंत्री गिरीश महाजन यांचे आता काँग्रेस नेते राहुल गांधींसाठी गणरायाला `हे` साकडे!

Girish Mahajan politics, Minister Mahajan slammed Rahul Gandhi for his remarks on reservation- भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात केली जळगाव शहरात केली निदर्शने
Girish Mahajan & Rahul Gandhi
Girish Mahajan & Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan News: भारतीय जनता पक्षाचे नेते राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत काल निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला.

भारतीय जनता पक्ष काँग्रेस विरोधात आंदोलन करण्याची एकही संधी सोडत नाही. सध्या अमेरिकेत विविध संस्थांमध्ये व्याख्याने देत असलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांनी लक्ष्य केले आहे. यासंदर्भात श्री. गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या विधानाचा पुरेपूर राजकीय उपयोग भाजपकडून केला जात आहे.

या निमित्ताने जनतेमध्ये एक वेगळा संदेश देण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत ४०० पार हा रा भाजपने दिला होता. यासंदर्भात जनतेमध्ये भाजपला देशाची राज्यघटना बदलायची आहे, असा संदेश गेला. याविषयी भाजपच्या काही नेत्यांनी देखील असा संदेश देईल अशी वक्तव्य केली होती.

त्या वक्तव्यांचा मोठा फटका लोकसभा निवडणुकीत भाजपला बसला. त्यावर वेगळे नॅरेटीव्ह निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सध्या होत आहे. त्याला आगामी विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी देखील आहे.

Girish Mahajan & Rahul Gandhi
Girish Mahajan Politics: मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात राष्ट्रवादीची छुपी यंत्रणा सक्रिय?

यासंदर्भात काँग्रेस नेते गांधी यांच्या विरोधात भाजप नेत्यांनी जळगाव येथे जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात मंत्र्यांसह विविध आमदारही सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी आक्रमक होत घोषणा दिल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला..

यावेळी मंत्री गिरीष महाजन यांनी गणरायाचा धावा केला. त्यांनी गणरायाला साकडे घातले. विरोधी पक्षनेते गांधी हे देशातील आरक्षण व्यवस्थेवर असंबद्ध विधाने करीत आहेत. त्यांना आरक्षण संपवायचे आहे. त्यांना सदबुद्धी देवो, अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप नेते आणि मंत्री महाजन यांसह भाजपच्या विविध आमदार तसेच पदाधिकाऱ्यांनी काल जळगाव येथे निदर्शने केली. यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते जमले होते. त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारले.

Girish Mahajan & Rahul Gandhi
Kopargaon Assembly Constituency : अजितदादांच्या डेअरिंगवर आमदार काळे-कोल्हेंच्या मतदार संघात रंगलीय चर्चा...

जिल्ह्यात देखील विविध ठिकाणी अशी आंदोलने भाजपकडून करण्यात आली. यासंदर्भात मंत्री महाजन म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या मनात एक आणि पोटात एक अशी स्थिती आहे. या देशांमध्ये आरक्षण व्यवस्था अतिशय उदात्त हेतूने निर्माण करण्यात आली आहे.

त्यामध्ये उपेक्षित घटकांना योग्य आणि समान संधीची व्यवस्था आहे. मात्र काँग्रेस नेते गांधी यांना ती मंजूर नसावी. त्यांनी काँग्रेस सत्तेत आल्यास आरक्षण व्यवस्था संपवून टाकू, असे विधान केले आहे. त्याला भाजपचा तीव्र विरोध असेल. भाजप असे कदापिही होऊ देणार नाही, असा इशारा दिला.

या देशातील विरोधी पक्ष आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदीद्वेषाने पछाडले आहे. या द्वेषामुळे ते काही बाही विधाने करतात. मोदींना विरोध करताना काहीही विधाने करण्यात त्यांना कमीपणा वाटत नाही. याचा आम्ही निषेध करतो.

यावेळी आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, पक्षाचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, जळगाव महानगर अध्यक्ष उज्वला बेंडाळे, दीपक सूर्यवंशी, माजी उपमहापौर डॉ अश्विन सोनवणे, पिंटू काळे, शक्ती महाजन यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी होते. या पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत गांधी यांचा निषेध केला.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com