Jaykumar Gore-Prabhakar Gharge-Ramraje Naik Nimbalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jaykumar Gore Defamation Case : रामराजे म्हणतात ‘मुंबईत जबाब घ्या’; प्रभाकर घार्गेंनी अटकपूर्व जामीन घेऊनच पोलिस ठाणे गाठले!

Satara Political News : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी आणि खंडणी प्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी अटक पूर्व जामीन मिळविला आहे. त्यानंतर ते वडूज पोलिस ठाण्यात हजर झाले होते.

Vijaykumar Dudhale

Satara, 04 May : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना वडूज पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले हेाते. त्यांना शनिवारी (ता. 03 मे) चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, रामराजेंनी वकिलांच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत मागून घेतली आहे.

माजी आमदार तथा सातारा (Satara) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक प्रभाकर घार्गे यांनी मात्र शनिवारी रात्री वडूज पोलिस ठाण्यात हजेरी लावली. ते वकील आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह पोलिस ठाण्यात आले होते. अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर घार्गे हे पोलिस ठण्यात आले होते.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटीची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली होती. तिच्या पाठोपाठ पत्रकार तुषार खरात, शिवसेना शिंदे गटाचे नेते अनिल सुभेदार यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यानंतर शुक्रवारी वडूज पोलिसांनी रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक प्रभाकर घार्गे यांच्यासह 12 जणांना पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार घार्गे हे चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर झाले होते.

निवृत्त विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या पुण्यातील घरीही चौकशीसाठी पोलिसांचे पथक गेले हेाते. मात्र, देशमुख हे अगोदरच बाहेर पडल्याने पोलिसांना हात हालवत माघारी परतावे लागले होते. त्यानंतर शुक्रवारी (ता. 02 मे) वडूज पोलिसांनी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar), सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक प्रभाकर घार्गे यांच्यासह बारा जणांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स पाठविले होते.

रामराजे नाईक निंबाळकर यांची तब्येत बरी नसल्याने ते मुंबईत उपचार घेत आहेत. त्यामुळे त्यांनी वकिलाच्या माध्यमातून चौकशीसाठी सात दिवसांची मुदत मागून घेतली आहे. मुंबईत जबाब घेण्यात यावा, अशी विनंतीही रामराजेंनी केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक प्रभाकर घार्गे हे मात्र चौकशीसाठी आवर्जून उपस्थित होते. ॲड. धायगुडे, ॲड. प्रिया घार्गे या दोन वकीलासह मोठी मुलगी प्रीती घार्गे पाटील, जावई राहुल पाटील, बाजार समितीचे सभापती दत्ता पवार यांच्यासह घार्गे यांनी वडूज पोलिस ठाण्यात आले होते. वडूजचे पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी त्यांचे रात्री उशिरापर्यंत जबाब घेतले.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी आणि खंडणी प्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी अटक पूर्व जामीन मिळविला आहे. त्यानंतर ते वडूज पोलिस ठाण्यात हजर झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT