
Satara, 02 May : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. विधान परिषदेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह तब्बल 12 जणांना समन्स बजावण्यात आले आहे, या समन्समुळे रामराजे निंबाळकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरामुळे साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
साताऱ्याच्या राजकारणात रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यात विळ्या भोपळ्याचे नाते आहे. दोघांनी एकमेकांवर जाहीरपणे चिखलफेक केलेली आहे, त्यामुळे रामराजे आणि गोरे यांच्यातील राजकीय युद्धाचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नव्या घडामोडीमुळे त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
एका महिलेला अश्लील फोटो पाठविल्याचा आरोप संबंधित महिलेने जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर केला होता. मात्र, आरोप करणाऱ्या मलिलेला एक कोटी रुपयांची रोकड घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली. यामध्ये पत्रकार तुषार खरात, शिवसेना शिंदे गटाचे नेते अनिल सुभेदार आणि संबंधित महिलेचा समावेश आहे.
दरम्यान, जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणी आज पोलिसांनी मोठे पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यापर्यंत पोचले आहेत. त्यावरून सातारा जिल्ह्यातील वडूज पोलिसांनी आज रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह तब्बल १२ जणांना समन्स पाठविण्यात आले आहे.
रामराजे नाईक निंबाळकर यांच्या बारा जणांना ह्या नोटिसा पाठविल्या आहेत. त्यांना वडूज पोलिस ठाण्यात उद्या अकरा वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर, पत्रकार आणि त्यांच्या संपर्कातील कार्यकर्ते यांच्यासह एकूण १२ जणांचा समावेश आहे. आता हे नेते चौकशीसाठी उद्या खरोखर चौकशी उपस्थित राहणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
तांत्रिक मुद्यावरच्या आधारे आम्ही संबंधित बारा जाणांना चौकशी बोलावले आहे. आमच्याकडे असलेले कागदोपत्री आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आम्ही या लोकांना चौकशी बोलविण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यामुळे नावे घेणे उचित नाही, असे वडूज पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.