Dilip Mane : सोलापूर बाजार समितीत पहिला डाव दिलीप मानेंचा? सभापती-उपसभापतीची 11 मे रोजी निवड

Solapur Bazar Samiti Sabhapati-Deputy Sabhapatil Election : बाजार समितीचे सभापती आणि उपसभापती निवडीसाठी रविवारी (ता. 11 मे रोजी) सकाळी नवनिर्वाचित संचालकांची बैठक होणार आहे. सभापतिपदासाठी माजी आमदार दिलीप माने यांचे नाव आघाडीवर आहे.
Dilip Mane
Dilip ManeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 03 May : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्वाधिक 13 जागा जिंकून एकहाती सत्ता मिळविली आहे. बाजार समितीचे सभापती आणि उपसभापती निवडीसाठी रविवारी (ता. 11 मे रोजी) सकाळी नवनिर्वाचित संचालकांची बैठक होणार आहे. सभापतिपदासाठी माजी आमदार दिलीप माने यांचे नाव आघाडीवर असून त्यांच्या समर्थक संचालकांची संख्या पाहता मानेंच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडण्याची शक्यता सर्वाधिक आहे. तसेच पॅनेल उभे करताना ठरलेल्या सूत्रानुसार माने यांची निवड निश्चित मानले जात आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Solapur Bazar Samiti) संचालक मंडळाची रविवारी (ता. 11 मे) सकाळी अकरा वाजता पहिली बैठक होणार आहे. त्या बैठकीत नवनिर्वाचित संचालकांमधून सभापती आणि उपसभापतींची निवड केली जाणार आहे. जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड हे अध्यासी अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. अकरा मेपासून लोकप्रतिनिधींच्या हाती पुन्हा एकदा सत्ता येणार आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane), सुरेश हसापुरे यांच्या मदतीने पॅनेल उभे केले होते. काँग्रेससोबतची युती न पटल्यामुळे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी मतभेद बाजूला ठेवून बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकत्र आले होते.

Dilip Mane
Bacchu Kadu On Ajit Pawar : बच्चू कडूंनी अजितदादांनी सुनावले; ‘बापानं आश्वासन दिलं, तरी ते पोट्याला पाळावंच लागतं’

बाजार समितीच्या निवडणुकीत कल्याणशेट्टी, माने, हसापुरे यांच्या पॅनेलने सर्वाधिक १३ जागा जिंकत सत्ता मिळविली. विरोधातील देशमुख यांच्या पॅनेल तीन जागांवर समाधान मानावे लागले होते. दोन अपक्ष संचालक निवडून आले आहेत. ते सत्ताधाऱ्यांसोबत जाऊ शकतात.

दरम्यान, सहकारी सोसायटी मतदारसंघातील माने आणि हसापुरे यांचे वर्चस्व पाहता ही जोडी कोणाकडे जाणार, त्यांची सत्ता येणार हे निर्विवाद सत्य होते, त्यानुसार कल्याणशेट्टी, माने, हसापुरे यांच्या पॅनेलने बाजार समितीच्या निवडणुकीत बाजी मारली. मात्र, निवडून आलेल्या संचालकांमध्ये दिलीप माने समर्थकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे सभापतिपदी माने यांच्या निवडीची सर्वाधिक शक्यता आहे.

Dilip Mane
Jaykumar Gore case : गोरे बदनामी प्रकरणात नवा ट्विस्ट; रामराजे अन्‌ संबंधित महिलेच्या संभाषणाची क्लिप व्हायरल, धक्कादायक विधाने आली समोर

भाजपच्या कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला. त्यावेळी पहिली तीन वर्षे दिलीप माने यांना सभापती देण्याचे सूत्र ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. उर्वरीत दोन वर्षांत कल्याणशेट्टी, हसापुरे आणि इतर गटाला तो मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अकरा मे रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिलीप माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com