Rohit Pawar-Abhijeet Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rohit Pawar Secret Blast : पक्षप्रवेशासाठी 'विठ्ठल' बंद पाडण्याची अट घालणारा पुढारी कोण? रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ

Pandharpur Politics : राज्य सहकारी बॅंकेच्या तक्रारीनंतर पंढरपुरात आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.

Vijaykumar Dudhale

Pandharpur News : ‘ज्या लोकांनी पूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखाना अडचणीत आणला. त्यांनी एका पक्षात प्रवेश करण्यापूर्वी एक अट टाकली आहे, ‘मी तुमच्या पक्षात येतो, पण विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि त्यांचे संचालक मंडळ तहकूब करा. नाही तर त्यांना अडचण आणा नाही अथवा कारखाना बंद पाडा.’ पण ती व्यक्ती कोण आहे, पंढरपूर तालुक्यातील जनतेने ओळखले आहे, असा गौप्यस्फोट आमदार रोहित पवार यांनी केला. (Who is leader made the condition of closing Vitthal factory for joining party?)

आमदार रोहित पवार हे आज पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. विठ्ठलाच्या दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात पोलिसांत करण्यात आलेली तक्रार आणि त्याअनुषंगाने भाष्य केले. विठ्ठल कारखाना अडचणीत आणणारा तो नेता कोण, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

दरम्यान, राज्य सहकारी बॅंकेच्या तक्रारीनंतर पंढरपुरात आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. काखान्यावर कर्जाचा डोंगर कोणी उभा केला, असा सवाल अभिजित पाटील यांची विचारला होता. त्यामुळे विठ्ठल कारखान्याभोवती पंढरपूरचे राजकारण रंगणार हे आता स्पष्ट आहे.

रोहित पवार म्हणाले, शेतकऱ्यांचा कारखाना अडचणीत आणून तुम्ही स्वतःचे राजकारण करणार असाल तर लोक शांत बसणार नाहीत. लोकांनाही ती व्यक्ती कोण आहे, ते कळालं आहे. त्यामुळे लोकं आता शांत बसणार नाहीत. विठ्ठल सहकारी साखर काखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि त्यांच्या संचालकांच्या पाठिशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आम्ही खंंबीरपणे उभे राहू. त्यामुळे सत्तेतील लोकांनी विठ्ठल काखान्याबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्यावा.

ईडीची नोटीस आली म्हणून घाबरून मी विठुरायाच्या चरणी आलो नाही. पण, जे लोक आम्हाला घाबरवण्याचे काम करत आहेत, त्यांच्या विरोधात लढण्याचे बळ मिळावे; म्हणून मी विठ्ठलाच्या चरणी आलो आहे. सामान्य लोकांच्या अडचणी सुटाव्यात आणि लोकशाहीचा आवाज दाबणाऱ्या ताकदीच्या विरोधात लढण्यासाठी बळ मिळावं; म्हणून मी पंढरपुरात आलो आहे, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT