Rohit Pawar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे शंभर कोटी रुपयांची संपत्ती आली कुठून, असा आरोप केला होता. त्याला रोहित पवार यांनी उत्तर देत पलटवार केला आहे. शिरसाट यांना मंत्री व्हायचं आहे आणि त्यांना दोन वर्षे मंत्री होता येत नाही.
त्यामुळे त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम झाला असल्याची टीका पवार यांनी शिरसाट यांच्यावर केली. आमदार रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाड टाकण्यात आली होती. कंपनीशी संबंधित सहा ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) ही छापेमारी केली होती. यावर रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन प्रश्नांवर उत्तरे दिली.
यावेळी भाजपवर प्रश्नांचा भडिमार त्यांनी केला. शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांनी रोहित पवार यांच्याकडे शंभर कोटी रुपयांची संपत्ती आली कुठून. अशी कोणती सोन्याची अंडी देणारी कोंबडी तुमच्याकडे आली आहे, असा आरोप केला होता. त्यावर रोहित पवार यांनी शिरसाट यांच्यावर पलटवार केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी रोहित पवार म्हणाले, 'माझ्याकडे एवढी संपत्ती आलीच कशी हे म्हणजे गेली बावीस वर्षे व्यावसायिक क्षेत्रात काम केले ते सगळं शिरसाटांना वेगळ सांगितले पाहिजे. त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम झाला आहे. त्यांना व्हायचायं मंत्री, दोन वर्षे त्यांना मंत्री होता येत नाही. ते मंत्रीपदाचा एवढा विचार करतात की, त्यांनी मंत्रीपदासाठी जे - जे कपडे शिवले आहेत ते सुद्धा आता त्यांना आता बसत नाहीत.
त्याच्यात जर त्यांनी टोपी शिवली असती तरी ती छोटी पडली असती, कारण त्यांचे विचार छोटे झाले आहेत. त्यामुळे त्यांचा मेंदूही छोटा झाला' असल्याची टीका रोहित पवार यांनी शिरसाट यांच्यावर केली. तसेच शिरसाट यांना जे काय बोलच ते बोलतील. त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर त्यांनी पुढे यावे. समोरासमोर बसून बोलू. तुम्ही सत्तेसाठी हे करत असल्याचा आरोपही पवार यांनी संजय शिरसाट यांच्यावर केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.