Solapur News : खबरदार...जरांगेंविषयी अपशब्द काढाल तर जीभ हासडू; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

Maratha Kranti Morcha : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या उपोषणाची सरकारने दखल घेतली नाही तर सोलापूर जिल्ह्यातील सर्व मराठा आमदारांना घेराव घालण्यात येईल
Maratha Kranti Morcha
Maratha Kranti MorchaSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : मराठा आरक्षणासाठीच्या मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील बेमुदत उपोषणाची सरकारने दखल घेतली नाही तर सोलापूर जिल्ह्यातील मराठा आमदारांना घेराव घालण्यात येईल. तसेच, जरांगे पाटील यांच्याविषयी मराठा आमदारांनी अपशब्द वापरले, तर त्यांची जीभ हसडण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला. (...Then Maratha community's MLA will be surrounded : Maratha Kranti Morcha)

मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई लढण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथून मुंबईकडे कूच केली आहे. त्यांना समर्थन देण्यासाठी राज्यातील मराठा बांधवही मुंबईकडे रवाना झाला आहे. सोलापुरातूनही शेकडो मराठा बांधव मुंबईकडे निघाला आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे येत्या २६ जानेवारी आझाद मैदानावर पोहोचणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Maratha Kranti Morcha
Ram Kadam's Letter : शिवसेनेने भाजपच्या राम कदमांना अनुल्लेखाने मारले!

मराठा आरक्षणाची मागणी मान्य व्हावी आणि मनोज जरांगे पाटील यांना उत्तम आरोग्य मिळावे, यासाठी सोलापुरातील बाळे येथील खंडाेबा मंदिरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाआरती करण्यात आली. त्या वेळी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी हा इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या उपोषणाची सरकारने दखल घेतली नाही तर सोलापूर जिल्ह्यातील सर्व मराठा आमदारांना घेराव घालण्यात येईल, असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दास शेळके यांनी सांगितले. तसेच, मराठा आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरू नयेत; अन्यथा खंडोबाच्या आसूडाने त्यांची जीभ हसडू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुनील रसाळे यांनी दिला आहे.

Maratha Kranti Morcha
Athawale On Maratha Reservation : आठवलेंनी सुचविला मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला; सरकार स्वीकारणार का?

माजी नगरसेविका लता फुटाणे यांची मराठा क्रांती मोर्चा महिला आघाडीच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांना या निवडीचे पत्र या वेळी देण्यात आले. या वेळी आबा सावंत, सुनिल सुरवसे, सुनील हुंबे, विश्वास चव्हाण, धर्मराज भोसले, बाबा शेख, गणेश सरोळे, संतोष जाधव, शेखर फंड, निलेश शिंदे, अमित माने यांच्यासह युवक उपस्थित होते.

Maratha Kranti Morcha
Sangli Loksabha : ‘विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली सांगली लोकसभा लढणार; यंदा कोणतीही कसर ठेवणार नाही’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com