Udayanraje Meet Danve : उदयनराजे अंबादास दानवेंना सॉरी का म्हणाले? साताऱ्यात काय घडला संवाद?

Ambadas Danve News : दानवेंना भेटण्यासाठी उदयनराजे एवढ्या तातडीने आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.
Udayanraje-Ambadas Danve
Udayanraje-Ambadas Danve Sarkarnama
Published on
Updated on

Satara News : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सातारा येथील विश्रामगृह येथे आल्याचे कळताच भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले हे तातडीने त्यांना भेटण्यासाठी आले. दानवेंना भेटण्यासाठी उदयनराजे एवढ्या तातडीने आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. मात्र, मुलाच्या लग्नाला येऊ न शकल्याबद्दल दानवेंना सॉरी म्हणून उदयनराजे निघून गेले. (Why did Udayanaraje say sorry to Ambadas Danve?)

शिवसेना नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज सातारा दौऱ्यावर आले होते. ते शासकीय विश्रामृहात दाखल होताच, भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हेही तातडीने विश्रामृहात दाखल झाले. उदयनराजेंनी साताऱ्यात त्यांचे स्वागत केले. त्यावेळी ‘मुलाच्या लग्नाला यावे; म्हणून महाराज मी आपल्याला दोन वेळा फोन केला होता. तसेच पत्रिकाही दिली होती’ असे दानवे यांनी सांगताच उदयनराजे यांनीही ‘आपल्याला पत्रिका मिळाली होती. मात्र, काही कामानिमित्त मी लग्नाला येऊ शकलो नाही, सॉरी,’ दिलगिरी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Udayanraje-Ambadas Danve
Solapur News : खबरदार...जरांगेंविषयी अपशब्द काढाल तर जीभ हासडू; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

दानवे यांच्या मुलाच्या लग्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. दोन्ही शिवसेनेचे नेते एकाच मांडवाखाली त्या दिवशी आले होते. त्याची चर्चा संपूर्ण राज्यात झाली होती. त्या लग्नाला उदयनराजे जाऊ शकले नव्हते, त्यामुळे त्यांनी साताऱ्यात आलेल्या दानवे यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली.

मनोज जरांगे-पाटील यांना संविधानाचा दाखला देत काही गोष्टी पाळण्याच्या सल्ला देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. अजितदादांनी संविधान पाळावं, असं सांगणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असे म्हणत त्यांनी दादांना फटकारले. 

Udayanraje-Ambadas Danve
Athawale On Maratha Reservation : आठवलेंनी सुचविला मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला; सरकार स्वीकारणार का?

अजितदादांनी खरंतर जरांगे-पाटलांच्या भूमिकेचे स्वागत केले पाहिजे. जरांगे-पाटील ज्या पद्धतीने भूमिका मांडतात आणि समाज त्यांच्यामागे एकवटला आहे. त्यांचा अवमान अजितदादांनी करू नये, अशी विनंतीही अंबादास दानवेंनी केली. तसेच, साताराच नव्हे तर राज्यात सर्वच ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभेची चाचपणी झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यापासून महाविकास आघाडीतील नेते त्यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत.

वन नेशन वन इलेक्शन होणार नाही

वन नेशन वन इलेक्शनला काॅंग्रेस पक्षाने विरोध केला होता. आता आम आदमी पक्षानेही विरोध केला आहे. यावर अंबादास दानवे म्हणाले, वन नेशन वन इलेक्शन हा विषय होणारच नाही. मग त्या विषयावर कशाला चर्चा करायची, असे म्हणत केवळ फार्स निर्माण केला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

Udayanraje-Ambadas Danve
Sangli Loksabha : ‘विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली सांगली लोकसभा लढणार; यंदा कोणतीही कसर ठेवणार नाही’

सातारा जिल्ह्याच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत दानवे यांनी शासकीय विश्रामगृहात चर्चा केली. या वेळी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, हर्षल कदम उपस्थित होते.

Edited By : Vijay Dudhale

Udayanraje-Ambadas Danve
Maratha Reservation : नगरमध्ये 1 लाख 47 हजार कुणबी-मराठा जातप्रमाणपत्र वाटपासाठी विशेष मोहिम

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com