Shambhuraj Desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shambhuraj Desai : सातारा लोकसभा कोण लढवणार, राष्ट्रवादी, भाजप की शिवसेना ? मंत्री शंभूराज देसाई म्हणाले...

Satara Loksabha Election : विजय वडेट्टीवार यांनी त्यांचा पक्ष कितव्या नंबरला असणार आहे याचा विचार करावा.

Rahul Gadkar

Kolhapur News : भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं लोकसभेच्या 45 हून अधिक जागा निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. यात जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला असल्याची चर्चा आहे. यातच आता सातारा लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांनी आपला खासदार निवडून आणण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार गट यांच्याकडे इच्छुक उमेदवारही आहेत. भाजपनेही जोरदार तयारी केली असली तरी त्यांचा उमेदवार कोण हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. पण आता मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मोठं विधान केलं आहे.

उत्पादन शुल्कमंत्री शंभूराजे देसाई शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या वेळी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत सूचक विधान केले आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी आत्ताच सहभागी झाला आहे. आत्ताचे खासदार शरद पवारांच्या गटात आहेत. दादांच्या वक्तव्याचा आम्ही आदर करतो असे ते म्हणालो.

साताराच्या जागेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तीनही नेते एकत्र बसून निर्णय घेतील. आता आमचा योग्य पद्धतीने सुखाचा संसार सुरू झाला आहे. 2024 ला लोकसभेतल्या 45 जागा आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या 200 जागा आम्ही जिंकू, असा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आम्ही येत्या अधिवेशनात सरकार मराठा समाजासह धनगर आणि इतर आरक्षणावर सकारात्मक चर्चा करेल. कोणाचं तरी काढून कोणालातरी दिले जाईल, असा एक गैरसमज सध्या जात आहे. कोणाचेही काढून न घेता आणि कायदेशीरदृष्ट्या टिकणारे आरक्षण हे सरकार देणार असल्याचे स्पष्टीकरण मंत्री देसाई यांनी दिले.

आंदोलनात दगडफेक, जाळपोळ, पोलिसांवर हल्ले झाले तर वेगवेगळ्या नियमानुसार कारवाई होत असते. सरकार जाणीवपूर्वक कठोरपणे कारवाई करण्याच्या मनस्थितीत नाही. मुख्यमंत्री शिंदे यांच्या शब्दावर त्यांचा विश्वास आहे, असे जरांगे यांनी सांगितले आहे. त्यांनी संयम पाळावा, असे आवाहन देसाई यांनी जरांगे पाटलांना केले आहे.

माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावरील हल्ला प्रकरणावर देसाई म्हणाले, राजेश टोपे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याची माहिती नाही, पण मागणी करत असताना सनदशीर मार्गाने करावी. कोणीही कायदा हातात घेऊ नये. असेही ते म्हणाले.

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी त्यांचा पक्ष कितव्या नंबरला असणार आहे याचा विचार करावा. ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्ष कितव्या नंबरला गेला, याची आकडेवारी मिळवावी. त्यांनी जो आम्हाला शब्दप्रयोग केला आहे, तशीच अवस्था त्यांची 2024 नंतर होणार असल्याचा टोला देसाई यांनी लगावला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT