विशाल वामनराव पाटील
Patan News : गेल्या काही काळापासून सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे सर्वाधिक पक्षांतर आणि पक्षप्रवेश होताना दिसत आहेत. नुकतेच पाटण तालुक्यातील काळगाव विभागातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे माजी बांधकाममंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेना नेते आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटात प्रवेश केला आहे. सततचे होणारे पक्षांतर राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये धोकादायक ठरू शकते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विक्रमसिंह पाटणकर आणि शंभूराज देसाई यांच्यात पारंपरिक राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे यांच्यातील शह काटशहच्या राजकारणामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील राजकारण कायमच तापलेले पाहायला मिळते. नुकतेच पाटण तालुक्यातील काळगावअंतर्गत चौगुलेवाडी- आचरेवाडी, सावंतवाडी, कोळगेवाडी, मुटलवाडी येथील ग्रामस्थांनी शंभूराज देसाई यांची मुंबईतील पावनगड निवासस्थानी भेट घेऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या वेळी माजी पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई, पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विलास गोडांबे,एराेली विभाग प्रमुख चंद्रकांत चाळके, सुभाष बावडेकर, निवृत्त पोलिस उपनिरीक्षक आबासाहेब भिंगारदिवे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पालकमंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांच्याकडून सध्या मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांना देसाईंच्या माध्यमातून ग्राम सुविधा व ग्रामविकासाच्या कामांसाठी निधी मिळू लागल्याने कार्यकर्त्यांचे आपसूकच शिवसेनेत प्रवेश वाढल्याचे बोलले जात आहे.
गेली अनेक वर्षे पाटणकर गटासोबत असणारे कार्यकर्ते सध्या शंभूराज देसाई यांच्या गटात प्रवेश करत आहेत. यांचे आत्मचिंतन करण्याची गरज पाटणकर गटाला असल्याचे बोले जात आहे, तर दुसरीकडे आगामी निवडणुकांमध्ये या पक्ष प्रवेशाचा फायदा देसाई गटाला होणार का ? हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.