Satatra ZP-Shambhuraj Deasi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP Update : सातारा ZP सभापती निवडणुकीवर बहिष्कार का? शंभूराज देसाई म्हणाले, ‘भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत...’

Zilla Parishad Sabhapati Election : शंभूराज देसाई यांनी सत्तेचा गैरवापर आणि हुकूमशाहीचा आरोप करत भाजपविरोधात शिवसेना-राष्ट्रवादीने सातारा झेडपी सभापती निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे स्पष्ट केले.

Vijaykumar Dudhale

Satara, 04 April : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत प्रशासन ज्या पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत वागलं. त्या निवडणुकीत बळाचा, सत्तेचा आणि हुकूमशाही पद्धतीचा वापर झाला, त्याचे तीव्र पडसाद राज्यासह देशभरात उमटले, त्यामुळे अशा वातावरणात भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची नाही, असं आमचं ठरलं, त्यामुळे जिल्हा परिषद सभापती निवडणुकीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी बहिष्कार टाकला, असे सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

सातारा जिल्हा परिषदेतील (Satara Zilla Parishad) अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीच्या वेळी पालकमंत्री देसाई यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली होती. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांना मतदान करू न देता अटक करण्यात आली होती. त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. त्याचा निषेध म्हणून भाजपसोबत निवडणूक लढवायची नाही, असं आम्ही ठरवलं होतं, असे देसाई यांनी सांगितले.

शंभूराज देसाई (Shambhuraj Desai ) म्हणाले, सातारा जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडणुकीसाठी मी, मंत्री मकरंद पाटील आणि शशिकांत शिंदे आम्ही तिघांनी आमच्या जिल्हा परिषद सदस्यांची मतं जाणून घेतली. कारण, वीस मार्च रोजी झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीनंतर आमचे सर्व सदस्य आपापल्या मतदारसंघात गेले होते. त्यामुळे आम्हाला एकत्रितपणे कोणालाही बोलता आलं नव्हतं. वीस मार्च रोजी घडलेल्या प्रकाराबाबत सदस्यांचा भावना तीव्र होत्या. त्यांनी त्या व्यक्त केल्या.

बळाचा, सत्तेचा गैरवापर आणि हुकूमशाही पद्धतीने अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली, ती केवळ राज्यातच नाही, तर देशभर गाजली. देशपातळीवरील माध्यमांनी त्याची दखल घेतली. प्रशासन जे वागलं, त्याची प्रतिक्रिया संपूर्ण राज्यात उमटली. अशा वातावरणात भाजपच्या बरोबर निवडणूक लढवायची नाही, कोणत्याही परिस्थिती आम्ही या निवडणुकीत सहभाग घेऊ इच्छित नाही, अशी भूमिका सदस्यांनी मांडली, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.

पालकमंत्री देसाई म्हणाले, शेवटी मी, मकरंदआबा पाटील, खासदार नितीन पाटील, शशिकांत शिंदे, संजीवराजे निंबाळकर आम्ही सर्वांनी सदस्यांचा भावनांचा विचार करून त्यांच्या विचाराशी सहमती दर्शविली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अपक्षांनी सभापती निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

आमचे सर्व जिल्हा परिषद सदस्य काळ्या फिती लावून सभागृहात गेले. आमच्या सदस्यांनी सभागृहात वीस तारखेच्या घटनेचा तीव्र निषेध केला. काळ्या फिती लावून झेडपीच्या पायऱ्यावर बसलेले सदस्य सातारा जिल्ह्याने पहिल्यांदाच पाहिले, त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीवर आमच्या भावना तीव्र आहेत, असेही त्यांनी शेवटी नमूद केले.

आमच्या एका जरी सदस्यावर अन्याय झाला; तर...

आमचे सर्व सदस्य झेडपीच्या कामकाजात सहभागी होतील. जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर आमचे सदस्य आवाज उठवतील. आमच्या एका जरी सदस्यावर अन्याय झाला, तर आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी उभे राहू. वीस तारखेच्या प्रकाराबद्दल आमच्या भावना तीव्र आहोत. त्यामुळे सदस्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या, त्या भावनांशी आम्ही जिल्ह्यातील सर्व नेतेमंडळी सहमत आहोत, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT