Satara ZP : साताऱ्यात ZP सभापती निवडीतही भाजपला पोलिसांचीच मदत? अनिल देसाई अन् संदीप मांडवेंनी सांगितली खेळी

Satara Zilla Parishad Politic's : पोलिस अडवणुकीमुळे वेळेत पोहोचता न आल्याने उमेदवारी दाखल करता आली नाही, असा आरोप करत राष्ट्रवादी सदस्यांनी सातारा झेडपी सभापती निवडणुकीवर बहिष्कार टाकला.
Satara ZP NCP-Shivsena Member
Satara ZP NCP-Shivsena MemberSarkarnama
Published on
Updated on

Satara, 04 April : सातारा पोलिसांनी आमची ठिकठिकाणी अडवणूक, तपासणी करण्यात आली. जाणूनबुजून आम्हाला सभागृहात वेळेवर पोचू दिले नाही. आम्ही सभागृहात १२ वाजून १० मिनिटांनी पोचलो, पण प्रशासनाने आम्हाला सभागृहात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेळ दिला नाही, त्यामुळे आम्ही जिल्हा आणि पोलिस प्रशासनाचा निषेध करत सातारा जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडीवर बहिष्कार टाकला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांनी सांगितले.

अनिल देसाई (Anil Desai) म्हणाले, आम्हाला सभागृहात सोडावे, यासाठी आम्ही वीस मिनिटे पोलिसांशी झगडत आहोत. प्रशासनाकडे निवडून आलेल्या सदस्यांची यादी आहे, आम्हाला पाच मिनिटांत सर्वांना सभागृहात सोडायला पाहिजे होते. मात्र, आम्हाला मोबाईल घेऊन जाऊ नका, असे आज सांगण्यात आले.

सातारा जिल्हा परिषद (Satara Zilla Parishad) अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीच्या वेळी सर्व सदस्य मोबाईल घेऊन आतमध्ये गेले होते. मात्र, आम्हाला आज जाणीवपूर्वक आडविण्यात आले. प्रशासनाने उमेदवारी अर्ज भरायला वेळ दिला नाही. लोकशाहीचा खून करणाऱ्या जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाचा निषेध करतो, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देसाई यांनी केला.

देसाई म्हणाले, आम्हाला सभापती निवडीसाठी प्रशासनाने उमेदवारी अर्ज भरू दिला नाही. मागच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी ११ ते ११.३० असा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेळ दिला होता. मात्र आज सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी १० ते १२ अर्ज भरायचा वेळ आहे, असे सांगत होते. पोलिसांनी आमचे अपहरण केले, त्याचा खुलासा करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी पाटील यांच्याकडे केले.

Satara ZP NCP-Shivsena Member
Satara ZP Sabhapati Election : राष्ट्रवादीतून फुटलेल्या लता कर्णे, ऋतुजा शिंदे यांना भाजपची उमेदवारी; सभापती निवडीवर शिवसेना-राष्ट्रवादीचा बहिष्कार

पोलिसांच्या मदतीने भारतीय जनता पक्षाने आमचे दोन सदस्य पळवून नेल्याची आम्हाला माहिती मिळाली. काल गुंडांच्या मदतीने दोन सदस्य पळविले. आमचं ३३ संख्याबळ आहे. आजही आमच्याकडे ३१ सदस्य उपस्थित आहे, असा दावा अनिल देसाई यांनी केला.

संदीप मांडवे म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या जवळ बॅरिकेड्‌स लावलेल्या ठिकाणी आम्हाला अडविण्यात आले. झेडपीच्या गेटवर आणि मेटल डिटेक्टरच्या ठिकाणी पोलिसांनी अर्धा तास अडविण्यात आले. त्यांनी आम्हाला वेळेवर पोचू दिले नाही. आतमध्ये गेल्यानंतर आमचे मोबाईल काढून घ्या, असे सांगण्यात आले. आम्ही १२ वाजून १० मिनिटांच्या आसपास सभागृहात पोचलो. जाणून बुजून अडवणूक करून आम्हाला सभागृहात वेळेवर पोचू दिले नाही.

Satara ZP NCP-Shivsena Member
Dharashiv ZP News : धाराशिव झेडपीचा मोठा निर्णय; 'भोंगा' वाजल्यानंतर राहणार दररोज 2 तास टीव्ही, मोबाइल बंद

आमच्याकडे ३३ लोकांचे बहुमत आहे. पण आम्हाला मतदानापासून वंचित ठेवण्याचे काम पोलिस प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. प्रशासनाने लोकशाहीची हत्या करण्यात आलेली आहे, असा आरोप मांडवे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com