Satara ZP Update : शिवसेना-राष्ट्रवादीचा पुन्हा गेम : सभापती निवडीत भाजपची बाजी, राष्ट्रवादीच्या दोन फुटीरांना लॉटरी

BJP Sabhapati Unopposed : विरोधकांच्या बहिष्कार आणि राष्ट्रवादी सदस्य फुटीमुळे भाजपने सातारा झेडपीच्या सर्व सभापती पदांवर बिनविरोध विजय मिळवत जिल्ह्यात सत्ता अधिक मजबूत केली आहे.
BJP Sabhapati
BJP Sabhapati Sarkarnama
Published on
Updated on

Satara, 04 April : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर विषय समित्यांच्या सभापती निवडीतही भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. राष्ट्रवादीचे दोन सदस्य पुन्हा फुटले आहेत. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीतून फुटून आलेल्या लता कर्णे आणि ऋतुजा शिंदे यांना सभापतिपदाची बक्षिसी मिळाली आहे. कर्णे, शिंदे यांच्यासह ऋषीकेश धायगुडे-पाटील, तेजस्विनी विक्रमशील कदम या भाजपच्या चारही सभापतींची बिनविरोध निवड झाली आहे.

दुसरीकडे पोलिस प्रशासनाने आम्हाला सभागृहात वेळेवर पोचू दिले नाही, आम्हाला अर्ज भरता आले नाहीत, असा आरोप करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सदस्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला, त्यामुळे चारही सभापतींची निवड बिनविरोध झाली आहे.

सभापती (Sabhaapti) निवडीच्या पार्श्वभूमीवर ऋतुजा शिंदे आणि आणखी एक सदस्य फुटल्याची कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी दिली. तसेच, पोलिसांनी आम्हाला सभागृहात वेळेवर पोचू नये; म्हणून ठिकठिकाणी आमची अडवणूक केली. पोलिसांनी मेटल डिटेक्टरजवळ आम्हाला अर्धा तास अडवून ठेवले होते, असा आरोप शिंदे आणि संदीप मांडवे यांनी केला.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांकडे अर्थ व बांधकाम समितीचे सभापतिपद दिले जाते. त्यामुळे शिक्षण व आरोग्य, कृषी व पशुसंवर्धन, समाज कल्याण, महिला व बाल कल्याण या चार समित्यांच्या सभापतीपदासाठी भाजपकडून चारच उमेदवारी अर्ज आले होते. छाननीअंती कोणाताही अक्षेप नसल्याने चारही अर्ज वैध ठरल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जाहीर केले.

BJP Sabhapati
Satara ZP : साताऱ्यात ZP सभापती निवडीतही भाजपला पोलिसांचीच मदत? अनिल देसाई अन् संदीप मांडवेंनी सांगितली खेळी

राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून आलेल्या ऋतुजा विराज शिंदे यांनी महिला व बाल कल्याण सभापतिपद दिले असून ऋषीकेश धायगुडे-पाटील यांच्या समाज कल्याण सभापतिपद सोपविण्यात आलेले आहे. राष्ट्रवादीतून भाजपच्या गोटात दाखल झालेल्या लता अविनाश कर्णे आणि तेजस्विनी विक्रमशील कदम यांनी शिक्षण व आरोग्य, कृषी व पशुसंवर्धन यापैकी कोणते सभापतिपद मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

BJP Sabhapati
Satara ZP Sabhapati Election : राष्ट्रवादीतून फुटलेल्या लता कर्णे, ऋतुजा शिंदे यांना भाजपची उमेदवारी; सभापती निवडीवर शिवसेना-राष्ट्रवादीचा बहिष्कार

ऋतुजा शिंदे, ऋषीकेश धायगुडे-पाटील, लता कर्णे, तेजस्विनी कदम या चौघांचेच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. त्याबाबतची घोषणा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com