Upsarpanch, Sarpanch Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gram Panchayat Politics : संसारगाडा चालविणारे आता हाकणार गावगाडा !

Wadgaon Gupta And Nombodi Village : नगरमधील आठ गावांतील उपसरपंच निवडले

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar Political News : नगर जिल्ह्यातील दोन गावांच्या ग्रामपंचायतीत सरपंच-उपसरपंच म्हणून पती-पत्नीची निवड झाली आहे. घरात पती प्रमुख असला तरी ग्रामपंचायतीत मात्र पत्नीच कारभारी असणार आहे. यातून आरक्षणामुळे महिला सक्षमीकरणात क्रांतिकारी पाऊल पडत असल्याची प्रचिती आल्याचे बोलले जात आहे.

ग्रामपंचायती सदस्यांसह लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यात नगर जिल्ह्यातील 198 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा समावेश होता. सध्या गावोगावी उपसरपंच पदाच्या निवडणुका होत आहेत. बहुतांश ठिकाणी उपसरपंच पदाच्या निवडी या सहमतीने बिनविरोध होताना दिसत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगरमधील वडगाव गुप्ता आणि निंबोडी या गावच्या ग्रामपंचायतीत लोकनियुक्त महिला सरपंचाचे पती ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून आलेले होते. आता त्यांच्या पतीचींच उपसरपंच म्हणून निवडी करण्यात आल्या आहेत. यामुळे वडगाव गुप्ता, निंबोडी ग्रामपंचायतीचा कारभार पती-पत्नी मिळून पाहणार आहेत. दरम्यान, नगर तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाच्या निवडणूक पार पडल्या. निंबोंडी ग्रामपंचायत वगळता सात ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध निवडी झाल्या.

वडगाव गुप्ता ग्रामपंचायतीची उपसरपंचपदी माजी सरपंच विजय शेवाळे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या पत्नी विद्यमान लोकनियुक्त सरपंच सोनूबाई शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली, निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम पवार, ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव अडसुरे यांनी निवडीचे काम पाहिले. या वेळी चौदा ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

निंबोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जयराम बेरड व शिवाजी बेरड यांच्यात चुरस होती. या निवडीत लोकनियुक्त महिला सरपंच सोनाली बेरड यांचे पती जयराम बेरड यांचा सात मतांनी विजय झाला. सरपंच सोनाली बेरड यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया झाली.

हम साथ साथ है..!

वडगाव गुप्ता ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सोनूबाई शेवाळे तर उपसरपंचपदी विजय शेवाळे हे पती-पत्नी ग्रामपंचायतीचा कारभार पाहणार आहे. ससारांचा गाडा ३५ वर्षे चालवला, आता दोघे एकत्र मिळून ग्रामपंचायतीचा गावगाडा सांभाळणार आहेत. तसेच निंबोडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली बेरड व उपसरपंच जयराम बेरड हे पती-पत्नी ग्रामपंचायतीचा कारभार पाहणार आहे. दहा वर्षे संसार सांभाळता सांभाळता दोघे मिळून आता गावचा कारभार पाहणार आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT