Maharashtra assembly election 2024 Voting Sarkarnama
महाराष्ट्र

Bjp News : सायनमधील मतदान केंद्रावर राडा; पोलिसांसोबत भाजपच्या 'या' बड्या नेत्यांची बाचाबाची

Politcal News : मतदान सुरु असताना बुधवारी दुपारी सायन कोळीवाड्यात बुथवर भाजपच्या दिग्गज नेत्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. या बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रकिया पार पडली. यावेळी अनेक ठिकाणी वादाच्या घटना घडल्या. त्यामुळे शांततेत सुरु असलेल्या मतदान प्रक्रियेला काही ठिकाणी गालबोट लागले. विशेषतः मुंबईतील सायन मतदारसंघातील कोळीवाडा येथील मतदान केंद्रावर मोठा राडा पाहावयास मिळाला. या ठिकाणी पोलिसांसोबत भाजपच्या बड्या नेत्यांची बाचाबाची झाली. त्यामुळे या ठिकाणचे वातावरण चांगलेच तापले होते. (Bjp News )

मतदान सुरु असताना बुधवारी दुपारी सायन कोळीवाड्यात बुथवर भाजपच्या दिग्गज नेत्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. या बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत भाजप नेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांची पोलिसांसोबत बाचाबाची सुरु असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. भाजपने (Bjp) या घटनेनंतर पोलिसांवर गंभीर आरोप केला आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मतदारांवर प्रभाव टाकल्याचा भाजपचा आरोप आहे.

सायन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्याकडे देण्यात आली होती. त्यामुळे ते सायन कोळीवाड्यामधील बुथला भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना एका बुथवर जात असताना त्यांना पोलिसांनी अडवले. त्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते होते.

भाजप नेत्याला अडविण्यात आलेल्या ठिकाणी नितीन सोनकांबळे नावाचा पोलीस अधिकारी होता. त्यासॊबतच पीएसआय रेश्मा पाटील होत्या. एका बाजूला त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे सर्व लोकं तिथून आत जात होती. त्यांचा नगरसेवक जात होता. दुसऱ्या बाजूला एखादी सुपारी घ्यावी, अशा पद्धतीने सोनकांबळे अधिकारी अत्यंत अर्वाच्य भाषेत आणि उर्मटपणे बोलत होते, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

या ठिकाणी उपस्थित असलेले पोलिस अधिकारी दोन्ही बाजूला दोघांना समान न्याय देत नव्हते. त्यामुळे दरेकर यांनीत्या अधिकाऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आता एका बाजूला पोलीस किंवा प्रशासन म्हणून दोघांना समान न्याय द्यायला पाहिजे ना? पण तिथली सर्व व्यवस्था काँग्रेसच्या दावणीला बांधल्यासारखी वाटली. त्यामुळे आम्ही वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या सर्व प्रकाराबाबत आम्ही आमची तक्रार दिली. ते त्याची चौकशी करतील, आम्ही त्यांच्यावर सक्त कारवाई करायला लावू”, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT