सागर आव्हाड
Disability Certificate Issue : बनावट दिव्यांग (अंपग) प्रमाणपत्राद्वारे IAS केडर मिळवणाऱ्या पूजा खेडकर प्रकरणात समाज कल्याण अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार आहेत. पूजा खेडकरला खोटं दिव्यांग युनिक कार्ड मिळवण्यासाठी या अधिकाऱ्याने मदत केली, असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात प्रशासनाने चौकशी समिती नेमली आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यांनी मोठ्या प्रमाणात अर्थपूर्ण व्यवहार करत वैद्यकीय अधिकाऱ्यांना मॅनेज करून पूजा खेडकरला दिव्यांग युनिक कार्ड मिळवून दिल्याचा आरोप निलेश निकम यांनी केला होता.
प्रवीण कोरगंटीवार यांच्या विरोधात प्रशासनाने चौकशी समितीची स्थापना करत पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. पुढील आठवड्यात जर सुनावणी झाली नाही तर दिवंगत समाज कल्याणचे मंत्रांच्या घरापुढे हे आंदोलन केले जाईल, असा इशारा निलेश निकम यांनी दिला आहे.
कोरगंटीवार यांनी अर्थपूर्ण व्यवहार करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना मॅनेज करून पूजा खेडकर हिला दिव्यांग कार्ड घरपोच सुद्धा नेऊन दिले आहे. याबाबत चौकशी समिती स्थापन करून कोरंटीवार यांच्यावरती दिव्यांग नसताना अर्थपूर्ण व्यवहार करून तिला दिव्यांग युनिक कार्ड दिल्याबद्दल त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निलेश निकम यांनी केली आहे.
यूपीएससीची फसवणूक केल्या प्रकरणी दिल्लीमध्ये पूजा खेडकर हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणीवेळी कोर्टाने त्यांना तातडीने अटक करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केली आहे. तसेच पूजाच्या जामीन अर्जावर 21 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
बनावट अपंगत्वाच्या प्रमाणपत्रामुळे अडचणीत आलेल्या पूजा खेडकर हीने पत्राद्वारे पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला होता. मात्र, जिल्हाधिकारी दिवसे यांनी पूजा यांचे हे आरोप फेटाळले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.