Pooja Khedkar- Dilip Khedkar Sarkarnama
महाराष्ट्र

Pooja Khedkar: पूजा खेडकरचे वडील 'या' मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार!

Dilip Khedkar will Contest Assembly Election: प्रतिज्ञापत्रावर उपस्थित होत आहेत अनेक प्रश्न; जाणून घ्या, कोणता मतदारसंघ आहे?

Mayur Ratnaparkhe

Dilip Khedkar News: बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे वडील आणि निवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. त्यांनी शेवगांव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष राहून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

याआधी वंचित बहुजन आघाडी(Vanchit Bahujan Aaghadi)चे उमेदवार म्हणून त्यांनी 2024 मध्ये अहमदनगर मधून लोकसभा निवडणुकही लढवलेली आहे. ज्यामध्ये त्यांचा पराभव झाला. आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वत: घटस्फोटीत असल्याचं म्हटलं आहे.

याचवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या शपथपत्रात (Loksabha Election) त्यांनी मनोरमा खेडकरशी विवाहित असल्याचं नमूद केलं होतं. याशिवाय संयुक्त मालिकीच्या संपत्तीची माहितीही दिली होती. खेडकरने स्वत:च्या कुटुंबास अविभाजित हिंदू परिवार देखील संबोधलं होतं.

एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांनी पुण्यातील कौटिंबिक न्यायालयात 2009मध्ये सामंजस्याने घटोस्फोटासाठी अर्ज केला होता. यानंतर ते दोघेही 25जून 2010रोजी एकमेकांपासून विभक्त झाले होते.

परंतु असेही म्हटले जाते की, घटस्फोटानंतरीह हे दाम्पत्य पुण्यातील बाणेर भागातील एका बंगल्यात एकत्र राहत होतं. तर विविध मुलाखतींमध्ये पूजा खेडकरने (Pooja Khedkar) दावा केला होता की, त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न शून्य आहे, कारण त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झालेला आहे आणि ती आपल्या आईसोबत राहते.

निवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणूक नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून लढवली होती. वंचित बहुजन आघाडीने लढवताना त्यांनी किटली चिन्हांवर निवडणूक लढवली. या निवडणूक सत्ताधारी पक्षाचे भाजपचे (BJP) उमेदवार सुजय विखे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके मैदानात होते. यात सुजय विखेंचा पराभव झाला. या निवडणुकीत दिलीप खेडकर यांना 13 हजार 749 एवढी मते मिळाली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT