manoj jarange patil prakash ambedkar sarkarnama
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : "जरांगे-पाटलांचं आंदोलन यशस्वी झालं, तर भयंकर...", प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

Prakash Ambedkar On bjp : "...म्हणून पक्ष, संघटना, आघाडी फोडाफोडी करणं चालू आहे," अशी टीका आंबेडकरांनी भाजपावर केली आहे.

Akshay Sabale

सगेसोयऱ्याची अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी मनोज जरांगे-पाटील 10 फेब्रुवारीपासून उपोषण करत आहेत. राज्य सरकारनं 20 फेब्रुवारीला बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी मोठं विधान केलं आहे. "जरांगे-पाटील यांचं आंदोलन यशस्वी झालं, तर सत्ता आणि राजकारणातील उलथापालथ ही भयंकर असेल," असा दावा आंबेडकरांनी केला आहे. ते वर्ध्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

मनोज जरांगे-पाटील यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगत प्रकाश आंबेडकरांनी सतर्क केलं होतं. याकडे प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं लक्ष वेधल्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, "एवढी वर्षे चळवळीचा अनुभव आहे. जरांगे-पाटलांचं आंदोलन यशस्वी झालं, तर सत्ता आणि राजकारणातील उलथापालथ ही भयंकर असेल. ही उलथापालथ न होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तो प्रयत्न होऊ नये म्हणून त्यांची औषधे, जेवण आणि पाण्यावर सरकारनं लक्ष द्यावं."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"बरेचजण अपघातात गेली, अचानकपणे मृत्यू झाल्याचं देशात घडलं आहे. त्यामुळे सरकारला मी सतर्क केलं आहे," असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.

"ओबीसीचं ताट वेगळं पाहिजे. गरीब मराठ्यांचं नव्यानं निर्माण करण्यात येत असलेले ताट वेगळं पाहिजे. ते जर केलं, तर महाराष्ट्रात शांतात राहिल. विशेष अधिवेशनात सरकारची हीच भूमिका पाहिजे," अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली.

"लोकसभेला भाजपच्या दीडशेच्यावरती जागा निवडून येणार नाहीत. चारशे हा आकडा सांगणं मानशास्त्राप्रणे स्वत:ला शाश्वत करण्यासारखं आहे. 'पराभव होतोय हे मला दिसतंय. पण, माझा पराभव होत नाही, हे स्वत:ची समजूत काढण्यासाठी 400 चा आकडा सांगणार,' अशी भाजपची परिस्थिती आहे. भाजपवाले पूर्णपणे घाबरलेले आहेत. म्हणून पक्ष, संघटना, आघाडी फोडाफोडी करणं चालू आहे. स्वत:चे घर शाबूत राहण्यासाठी दुसऱ्यांच्या घरावर बुलडोझर फिरवणे हे घाबरणाऱ्याचं काम असतं," अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी भाजपावर केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT