Solapur NCP : चारच दिवसांपूर्वी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश अन्‌ थेट महापौर होण्यासाठी शुभेच्छा!

Anand Chandanshive News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर चंदनशिवे हे आज पहिल्यांदाच सोलापूरच्या राष्ट्रवादी भवनमध्ये आले होते.
Anand Chandanshive
Anand Chandanshive Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केलेले माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे आज (ता. 18 फेब्रुवारी) सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात प्रथमच आले होते. राष्ट्रवादी कार्यालयात त्यांचे स्वागत करताना ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी यांनी चंदनशिवे, तुम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे पहिले महापौर होणार’ अशा शुभेच्छा दिल्या. अवघ्या चार दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत आलेल्या चंदनशिवेंना अशा शुभेच्छा मिळाल्याने तेही मनातून सुखावले होते. (Solapur Political Update)

आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 14 फेब्रुवारी रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर चंदनशिवे हे आज पहिल्यांदाच सोलापूरच्या राष्ट्रवादी भवनमध्ये आले होते. राष्ट्रवादी भवनात शहराध्यक्ष संतोष पवार आणि शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी चंदनशिवे यांचे फेटा बांधून स्वागत केले. (NCP Ajit Pawar Group)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Anand Chandanshive
Shirur Loksabha : अजितदादांच्या मनात नेमकं चाललंय काय? कोल्हेंचा पराभव करणारा शिरूरमधील उमेदवार कोण?

दरम्यान, गेली काही वर्षांपासून आनंद चंदनशिवे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली हेाती. मात्र, त्यांचा प्रवेश काही होत नव्हता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात चंदनशिवे यांच्या घरी भेटीचा कार्यक्रम होता. मात्र, अजितदादांना उशीर झाल्याने ते चंदनशिवे यांच्या घरी जाऊ शकले नव्हते. त्यामुळे चंदनशिवे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर चंदनशिवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 14 फेब्रुवारी रोजी मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्याने त्यांना थेट महापौर बनण्यासाठीच शुभेच्छा दिल्या आहेत. (Solapur Mayor)

या वेळी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी यांनीही चंदनशिवे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. चंदनशिवे यांचा महापालिकेत काम करण्याचा अनुभव दांडगा आहे. त्यामुळे आगामी काळात अजितदादांच्या नेतृत्वाखाली चंदनशिवे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले महापौर होणार, अशा सदिच्छाही व्यक्त केल्या.

Anand Chandanshive
Shivsena News : 'राऊतांनी जिभेला लगाम घालावा; अन्यथा कोरी करकरीत कोल्हापुरी पाठवू'

दरम्यान, सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आनंद चंदनशिवे यांच्या प्रवेशामुळे नक्कीच वाढणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ताकद वाढविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण मिळून काम करू, असे सांगून शहराध्यक्ष पवार आणि कार्याध्यक्ष बागवान यांनी चंदनशिवे यांना पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.

Anand Chandanshive
Ritesh Deshmukh : 'काका मी तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो'; भर व्यासपीठावरून सांगताना पुतण्या भावूक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Sandeep Kshirsagar Rajendra Maske.jpg
Sharad Pawar Parth Pawar Supriya Sule.jpg
NCP ZP Member Meet Sunetra Pawar
Solapur ZP nominated member election
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com