Raj-Uddhav Thackeray Alliance  sarkarnama
महाराष्ट्र

Bihar Politics: बिहार जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरलेल्या नेत्याचं खळबळजनक विधान; म्हणाले,'राज ठाकरे गुंड तर उद्धव...'

Bihar Election 2025 : बिहारमधील वर्षेअखेरीस नवे सरकार अस्तित्वात येणार आहे. एनडीए आणि इंडिया आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. राज्यात पुन्हा एकदा एनडीएचीच सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Deepak Kulkarni

Bihar News: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत राज्यात 6 आणि 11 नोव्हेंबर असं दोन टप्प्यांत मतदान होणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच 14 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळं आता बिहारमध्ये प्रचाराला वेग आला असून राजकीय नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी राजकारण तापलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय ठरणार्‍या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे या बंधूची आता बिहार विधानसभा निवडणुकीतही जोरदार चर्चा आहे. बिहारची विधानसभा निवडणूक जिंकायचीच या उद्देशानं राजकारणाच्या मैदानात उतरलेल्या जनसुराज्य पार्टीचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी प्रचारादरम्यान, एक खळबळजनक विधान केलं आहे.

जन सुराज्य पार्टीचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी एका मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जहाल टीका केली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरेंना लंपन एलिमेंट म्हटलं आहे. लंपन एलिमेंट म्हणजे असामाजिक किंवा गुंड व्यक्ती असा होत आहे. या त्यांच्या टीकेमागे मुंबईत बिहारींना मारहाण केली असू परप्रांतियाविरोधात मनसे नेहमीच आक्रमक भूमिका घेते हे कारण असल्याचं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

प्रशांत किशोर यांनी राज ठाकरे टीका करताना दुसरीकडे मात्र त्यांन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहे.तसेच त्यांचे आभारही मानले आहेत. यावेळी त्यांनी 2020 मध्ये उद्धव ठाकरेंसाठी काम केले असल्याचा दाखलाही दिला आहे. मात्र,या कामाची फी म्हणून त्यावेळी ठाकरेंकडून बिहारींना मुंबई मारहाण न करण्याची किंवा होऊ न देण्याचं आश्वासन मागितलं होतं. यानंतर मुंबईत बिहारी किंवा हिंदी भाषिकांना शिवसैनिकांकडून कधीच मारहाण न झाल्याचंही प्रशांत किशोर यांनी म्हटलं.

पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या प्रशांत किशोर यांच्या जन सुराज्य पक्षासह असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाला अनुक्रमे 2 व 3 जागा मिळतील, असा अंदाज आहे. बहुजन समाज पक्षाला केवळ एका जागेवर विजय मिळू शकतो. तर 26 जागांवर अटीतटीची लढत होईल, असा अंदाही सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडीतील पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. जागावाटपाआधी राज्यातील छोटे-मोठे पक्ष आपल्यासोबत घेण्यासाठी दोन्ही बाजूने कंबर कसली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार ही हिंदी पट्ट्यातील दोन निर्णायक राज्ये भारतीय राजकारणात अत्यंत महत्त्वाची मानली जातात.

बिहारमधील वर्षेअखेरीस नवे सरकार अस्तित्वात येणार आहे.एनडीए आणि इंडिया आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. राज्यात पुन्हा एकदा एनडीएचीच सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र,सत्ता आली तरी नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला फटका बसण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT