
Pune News : अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीचं वारं जोरदार वाहू लागलं आहे. एकीकडे भाजपने पुणे महापालिकेमध्ये 125 नगरसेवक निवडून आणण्याचे ध्येय ठेवत कामाला सुरुवात केली आहे. भाजपकडून 125 चा आकडा समोर आल्यानंतर आता विरोधी पक्षाकडून देखील आकडेमोड करण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पुण्यातील नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी देखील आकडेमोड केली असून भाजपचे किती नगरसेवक निवडून येऊ शकतात याबाबत दावा केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे याबाबत म्हणाले, महापालिका निवडणुका संदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र पुणे महापालिकेची निवडणूक थोडीशी वेगळी आहे. 2017 मध्ये जेव्हा महापालिकेचे निवडणूक झाली त्यावेळी सर्व प्रमुख पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत कोणती युती, आघाडी झाली नव्हती. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये फूट पडली असून आता या दोन्ही पक्षांमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत.
त्यामुळे सध्याची समीकरणे बदलली आहेत. मात्र, आकडेवारी करायची झाल्यास त्यावेळी शिवसेनेला आठ लाख 23 हजार मतदान झालं होतं. मनसेला तीन लाख 73 हजार मतदान झालं होतं. आणि एकसंघ असलेल्या राष्ट्रवादीला देखील 13 लाख मतदान झालं होतं. आणि त्यांचे जवळपास 42 नगरसेवक निवडून आले होते. आणि भाजपला (BJP) 22 लाख मतदान पडून त्यांचे 97 नगरसेवक निवडून आले होते.
त्यामुळे सध्या जर महाविकास आघाडी म्हणून ठाकरेंची शिवसेना , मनसे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांच्या एकत्रित मतांचा विचार केल्यास 50 टक्के प्रभागांमध्ये भाजपच्या मतांपेक्षा महाविकास आघाडीची मतं ही जास्त आहेत.
त्यामुळे तिन्ही पक्षांच्या मतांची जर बेरीज केली तर ती 16 ते17 लाखांपर्यंत जाते आणि याच गणित करायचं झालं तर यामुळे तब्बल 60 नगरसेवक हे महाविकास आघाडीचे निवडून येऊ शकतात. त्यामुळे भाजपाचे 100 ते 110 नगरसेवक निवडून येणार याबाबत स्वप्न पडत आहेत. ती परिस्थिती सध्या पुण्यामध्ये नाही. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष एकत्रित निवडणूक लढल्यास भाजपाला 60 जागापर्यंत रोखणं शक्य होईल.
सध्या मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जोडला गेल्यास भाजपपेक्षा महाविकास आघाडीचे नगरसेवक हे जास्त निवडून येतील. तसेच काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून याबाबत राष्ट्रीय पातळीवर निर्णय होतील. मात्र, काँग्रेस पुण्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये आल्यास भाजप 40 ते 50 नगरसेवकांच्या वर जाऊ शकणार नाही असा दावा वसंत मोरे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.