
Bihar Election 2025: Key Takeaways from Latest IANS–Matriz Poll : भारतीय निवडणूक आयोगाकडून बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यात दोन टप्प्यांत निवडणूक होणार असून 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. आयोगाने वेळापत्रक जाहीर केल्यानंतर पहिला ओपिनियन पोल आला आहे. त्यामध्ये विरोधकांना झटका बसणारे निकाल लागू शकतात, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Matrize-IANS ने हा सर्व्हे केला आहे. त्यानुसार बिहारमधील जनतेकडून एनडीएच्या पारड्यात मतांचे दान टाकल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांना झुकते माप मिळत असल्याचेही या सर्व्हेत आढळून आले आहे. सर्व्हेनुसार एनडीएला तब्बल 150 ते 160 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर विरोधकांना केवळ 70 ते 80 जागा मिळू शकतात.
इतर पक्ष आण अपक्षांना केवळ 9 ते 12 जागांवर समाधान मानावे लागू शकते. एनडीएला मिळणाऱ्या मतांचा टक्का 49 तर इंडिया आघाडीला 36 टक्के मते मिळतील, असा अंदाज आहे. दरम्यान, हा सर्व्हे बिहारमधील लोकांशी चर्चा करून तयार करण्यात आला आहे. यामध्ये 243 मतदारसंघातील 46 हजार 862 लोकांशी चर्चा करण्यात आली आहे. ता. 18 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरदरम्यान हा सर्व्हे करण्यात आला.
हा ओपिनियन पोल इंडिया आघाडीचे टेन्शन वाढविणार ठरणारा आहे. काँगेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी राज्यात सरकारविरोधात रान उठविले आहे. मतचोरीच्या मुद्द्यासह बेरोजगारी, पायाभूत सुविधांचे मुद्दे लोकापर्यंत पोहचवून लोकांचे मतपरिवर्तन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मतचोरीच्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावाही करण्यात आला होता. पण ओपिनियन पोलने या दोघांची जोडी इंडिया आघाडीसाठी घातक ठरताना दिसत आहे.
दुसरीकडे ‘एनडीए’ने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांत केलेल्या विविध घोषणांचा फायदा त्यांना मिळताना दिसत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्याचाही फायदा एनडीएला होऊ सकतो, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. आता प्रत्यक्ष मतदानानंतर निकाल काय लागणार, हे 14 नोव्हेंबरला स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.