Rahul Gandhi call to Prakash Ambedkar Sarkarnama
महाराष्ट्र

Rahul Gandhi call to Prakash Ambedkar : राहुल गांधींचा प्रकाश आंबेडकरांना फोन अन् निवडणुकीच्या तोंडावर चर्चांना उधाण!

Congress and Vanchit Bahujan Aaghadi : जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले राहुल गांधी; वंचित बहुजन आघाडी अन् काँग्रेसमधील कटूता संपणार का?

Mayur Ratnaparkhe

Rahul Gandhi and Prakash Ambedkar News : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान एक बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना फोन केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.शिवाय , पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे सूर जुळणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

खरंतर राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी प्रकाश आंबेडकरांना फोन करून त्यांच्या प्रकृतीबाबत विचारणा केली. कारण, ऐन निवडणुकीच्या काळात प्रकाश आंबेडकरांवर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर प्रकाश आंबेडकर पुन्हा प्रचारात दिसत आहेत. या दरम्यान प्रकाश आंबेडकर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे प्रचारसभेसाठी आले असताना त्यांना राहुल गांधींचा फोन आला होता. राहुल गांधींनी त्यांना प्रकृतीबाबत विचारणा केली आणि काळजी घेण्याचंही आवाहन केल्याची माहिती समोर आली आहे.

खरंतर याआधी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे दिसून आले होते. एवढंच नाहीतर काँग्रेसने अकोलामध्ये प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)विरोधात उमेदवारही उभा केला होता. या ठिकाणी प्रकाश आंबेडकर पराभूत तर झालेच शिवाय तिसऱ्या क्रमांकावरही फेकल्या गेले होते. त्यानंतर आता राहुल गांधींनी फोन केल्याने, दोन्ही पक्षातील कटूता संपते की काय? अशाही चर्चा सुरू आहेत.

दरम्यान विधानसभा निवडणूक संपल्यावर काँग्रेस आणि भाजप(BJP) एकत्र येऊन ओबीसी जनगणनेची मागणी मान्य करतील. तिथे ठराव मंजूर करतील की, ओबीसी जनगणनेची आकडेवारी नसल्याने त्यांचे शिक्षण आणि नोकरीमधील आरक्षण थांबवण्यात येत आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढली जात आहे. महाविकास आघाडी(MVA) आणि महायुती यामध्ये सरळ लढत होत असताना वंचितच्या स्वबळाच्या नाऱ्याने या विधानसभा निवडणुकीत वंचित निर्णायक भूमिका पार पाडू शकते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT