BJP on Ulema Board supports Mahavikas Aghadi : उलेमा बोर्डाने 17 अटींसह दिलेल्या पाठिंब्याचा प्रस्ताव काँग्रेसने स्वीकारला आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना कोंडीत पकडल्या जात आहे. तसेच भाजपने यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेमकुमार शर्मा यांनी कुख्यात गुंड दाऊद आणि छोटा शकीलच्या गुंडांना काँग्रेस सोडणार का? असा सवाल करून याचा खुलासा करण्याची मागणी केली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत उलेमा बोर्डाने काँग्रेसला(Congress) पाठिंबा दिला आहे. त्यांनी यासाठी एकूण 17 ठेवल्या होत्या आणि विशेष म्हणजे त्या सरसकट काँग्रेसने स्वीकारल्या आहेत. विविध गुन्ह्यांखाली 2012 नंतर कारागृहात असलेल्या मुस्लिम आरोपींची सुटका करण्यात यावी अशी अट देखील उलेमा बोर्डाने घातली आहे. अशी माहिती शुक्ला यांनी दिली.
याशिवाय मालेगावमध्ये नोकरी देण्याच्या नावावर 125 कोटी रुपये जमा करण्यात आले होते आणि ही रक्कम व्होट जिहादसाठी वापरण्यात आली असल्याचाही आरोप यावेळी त्यांनी केला. अनुसूचित जाती जमाती आणि त्यातील दहा टक्के आरक्षण मुसलमानांना द्यावे, धर्माचा आधारावर आरक्षण देण्याची मागणी केली उलेमाने केली आहे.
तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जाऊ शकत नाही हे आधीच स्पष्ट केले आहे. मात्र काँग्रेस मतांसाठी काहीही करायला तयार आहे. उलमा बोर्डाच्या मागणीने आता आरक्षण जिहाद सुरू होण्याचा देशात धोका निर्माण होऊ शकतो याकडेही भाजप(BJP) प्रवक्त्यांनी लक्ष वेधले.
याचबरोबर पहिले टेरोरिस्ट जिहाद, लव्ह जिहाद, व्होवोट जिहाद आता आरक्षणा जिहाद सुरू करण्याचा काम सुरू झाले आहे. मात्र जोपर्यंत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) आहेत तोपर्यंत धर्माच्या नावावर आरक्षण देणार नाही, असेही यावेळी त्यांनी ठणकावून सांगितले. राहुल गांधी यांनी अलीकडेच संविधान सन्मान संमेलनाला हजेरी लावली होती. त्यावेळशी भाजपचने अर्बन नक्षल्यवाद्यांना समर्थन देण्यासाठी ते सहभागी झाले असल्याचा आरोप केला होता. आता यात उलेमा बोर्डाने कोलेल्या मागण्यांची भर पडली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.