Nashik News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. याच वक्तव्य विरोधात सावरकर प्रेमींनी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी याप्रकरणी कोर्टात सुनावणी झाली. यावेळी राहुल गांधींना प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांना नाशिक कोर्टात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहे. राहुल गांधींना ऑनलाइन हजर न राहता प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहून आपली बाजू मांडावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या प्रकरणातील याचिकाकर्ते यांचे वकील मनोज पिंगळे यांनी ही माहिती दिली. पुढील सुनावणी मे महिन्यामध्ये होणार असल्याचे त्यांनी सांगितलं. दरम्यान, न्यायालया समोर सर्वजण समान असल्याचे मत ही न्यायालयाने यावेळी व्यक्त केले. त्यामुळे आगामी सुनावणीला राहुल गांधी (Rahul Gandhi) स्वत: हजर राहतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, या पूर्वी दुसऱ्या एका प्रकरणात राहुल गांधी यांच्या विरोधात गेल्याच वर्षी पुणे सत्र न्यायालयात मानहानीची याचिका दाखल केली होती. लंडन येथील भारतीय लोकांसमोर भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप आहे. पुणे पोलिसांनी याबाबतचा रिपोर्ट न्यायालयात दाखल केला आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुणे सत्र न्यायालयात मानहानीची याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने पुण्यातील विश्रामबाग पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते.
राहुल गांधींनी मार्च 2023 मध्ये लंडन येथील भाषणात केलेल्या वक्तव्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात हा खटला दाखल करण्यात आला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत लंडनमध्ये केलेले वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भोवले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.