Shivsena UBT News : शिंदेसेनेला उद्धव ठाकरेंच्या पक्षाला विरोधी पक्षनेते पदही मिळू द्यायचे नाहीये!

Eknath Shinde has expressed that the position of Opposition Leader should not be given to Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray faction. : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मात्र 'कौन बनेगा विरोधी पक्षनेता'यावरून रस्सीखेच सुरू आहे. आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, सुनील प्रभू या नावांवर पक्षात मंथन सुरू असल्याची माहिती आहे.
Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Party News
Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Party NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले, शिवसेना पक्ष फोडला, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवले. एवढे करूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे समाधान झालेले दिसत नाही. आता विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोधी पक्षनेता होऊ नये, असे प्रयत्न एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सुरू केले आहेत. खासदार संजय राऊत यांनी आम्ही विरोधी पक्षनेते पदावर दावा केल्याचे सांगितल्यावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांचा मुद्दा खोडून काढला.

संजय राऊत यांना काही कळत का? विरोधी पक्षनेता बसवण्यासाठी किती आमदार लागतात, एवढे संख्याबळ विरोधकांकडे आहे का? असा सवाल (Sanjay Shirsat) शिरसाट यांनी उपस्थित केला. विधानसभा अध्यक्षांना सर्व अधिकार आहेत, ते नियमानूसार निर्णय घेतील, असे सांगत शिरसाट यांनी संजय राऊत यांनी केलेला दावा फेटाळला. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मात्र 'कौन बनेगा विरोधी पक्षनेता'यावरून रस्सीखेच सुरू आहे.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), भास्कर जाधव, सुनील प्रभू या नावांवर पक्षात मंथन सुरू असल्याची माहिती आहे. भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर कोकणातील एकमेव आमदारही पक्ष सोडून जातो की काय? अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर वरिष्ठ नेत्यांनी जाधव यांची समजूत काढून त्यांना रोखले आहे. आता कोकणात झालेली पडझड पाहता विरोधी पक्षनेते पदावर त्यांची वर्णी लागण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जाते.

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Party News
Shivsena UBT : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी ठाकरेच असावे..., आमदारांसह नेत्यांचा सूर; भास्कर जाधवांच्या नावाला मात्र विरोध?

तर काही आमदारांना जाधव डोईजड ठरतील ही भिती सतावत असल्याने त्यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे रेटल्याची चर्चा आहे. संजय राऊत यांनी महाविकास आघाडी म्हणून आमच्या आमदारांची संख्या पन्नासहून अधिक आहे. त्यामुळे आमच्या प्रस्तावाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ज्यांना कायदा कळतो, जे कायद्याचे अभ्यासक आहेत, ते स्वीकारतील, असा विश्वास व्यक्त केला.

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Party News
Sanjay Shirsat On Sanjay Raut : पक्ष, कुटुंब फोडले तरी गप्प का? उद्धव ठाकरे यांचे कोणते गुपित संजय राऊत यांच्याकडे आहे !

मात्र राऊत यांचा दावा कसा चुकीचा आहे? हे सांगताना शिरसाट यांनी शिवसेना उबाठाकडे विरोधी पक्षनेता करण्याइतके संख्याबळच नसल्याचे म्हटले आहे. शेवटी विधानसभा अध्यक्ष योग्य निर्णय घेतील, असेही शिरसाट म्हणाले. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव सर्व समंतीने सरकारकडे आला तर त्याला मंजूरी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. त्या व्यतिरिक्त आलेल्या नावाला संख्याबळाचे कारण देऊन नाकारले जाऊ शकते, अशी माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com