Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Ram Raksha Andolan : रामरक्षा आंदोलनावेळी उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली; सरकारला थेट अल्टिमेटम दिल्याने टेन्शन वाढणार!

Ram Mandir theft News : उद्धव ठाकरेंनी थेट अल्टिमेटम दिल्याने येत्या काळात सरकारचे टेन्शन वाढणार आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : अयोध्येच्या राम मंदिरात चोरी झाल्याने उद्धव ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जागोजागी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. रविवारपासून राज्यव्यापी ‘रामरक्षा’ आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. भरपावसात रविवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून दादरच्या हनुमान मंदिरात रामरक्षा महाआरती करण्यात आली.

यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत उपस्थित होते. जोपर्यंत या चोरीचा निष्पक्षपातीपणाने निकाल लावला जात नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी मोठी घोषणा यावेळी उद्धव ठाकरेंनी केली. ठाकरेंनी थेट अल्टिमेटम दिल्याने येत्या काळात सरकारचे टेन्शन वाढणार आहे.

रविवारी सायंकाळी भर पावसामध्ये दादरच्या हनुमान मंदिरात हे आंदोलन पार पडले. या आंदोलनाला ठाकरे पक्षाच्या नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदुंचे पैसे लुटता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आम्हाला भाजपमुक्त राम हवाय. त्यामुळे आता राम रक्षा करण्यासाठी रस्त्यावर उतरा. शिवसेनेने (Shivsena) राम मंदिराला दिलेली चांदीची वीट कुठे गेली? राम रक्षा आंदोलन म्हणजे भर पावसात पेटलेली ठिणगी असल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिली.

शिवसेना संपवण्याचा अफजलखानी विडा त्यांनी उचलला आहे. त्यामुळे या आंदोलनासाठी सर्वांनी आता एकत्र या, जोपर्यंत या चोरीचा निष्पक्षपातीपणाने निकाल लागला जात नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी मोठी घोषणा देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे, त्यामुळे आता भविष्यात हे आंदोलन अधिक तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता जी जाग आली आहे, ती जाग तशीच ठेवा, झोपू नका, असेही यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केले.

अयोध्यमधील राम मंदिरात झालेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राम मंदिरासाठी कारसेवकांनी रक्त सांडले आहे, आम्ही भोळे, भाबडे हिंदू आहोत, पण मूर्ख नाही. कुणी मंदिर लुटत असेल तर हिंदू कधीही माफ करणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. राम मंदिराला केलेले सगळं दान कुठे गेले असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

अयोध्येच्या राम मंदिरात चोरी झाली असल्याने या प्रकरणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली असून, राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता राज्यभर आंदोलने होणार आहेत. त्यामुळे येत्या काळात सरकारपुढील अडचणीत बहर पडण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT