Mumbai News : पुण्यातील कोथरुड परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात गुंड निलेश घायवळ याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर घायवळ लंडनला पळून गेला आहे. गंभीर गुन्हा दाखल असताना पासपोर्ट कसा मिळाला? या प्रश्नाचे उत्तर अद्याप पुढे आले नाही. तर त्यातच त्याचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या सहीनंतर शस्त्र परवाना मिळाल्याचे पुढे आले. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे.
विरोधकांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली जात असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपच्या बड्या नेत्याच्या प्रचारसभेत भाषण करतानाचा गुंड निलेश घायवळ याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे या नेत्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातच राम शिंदे, तानाजी सावंत ते संतोष बांगर... निलेश घायवळ कोणा कोणाचा माणूस? रोहित पवारांनी प्रत्येक गोष्ट सांगितली.
एका गुन्हेगाराचे सत्ताधारी पक्षातील बड्या नेत्यांसोबतचे हे संबंध उघड झाल्याने, विरोधी पक्षाला सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करण्याची आयती संधी मिळाली आहे. भाजप (BJP) नेते आणि विधान परिषदेचे सध्याचे सभापती राम शिंदे यांच्या प्रचारसभेत भाषण करतानाचा गुंड निलेश घायवळ याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये गुंड निलेश घायवळ हा राम शिंदेंच्या पाया पडतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीच्या वेळी निलेश घायवळ हा राम शिंदेंच्या प्रचारामध्ये भाषण करतानाही दिसत आहे. त्यामुळे निलेश घायवळ आणि राम शिंदेंचे राजकीय संबंध समोर आल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.
त्यासोबतच गुंड निलेश घायवळवरून रोहित पवार यांनी शिंदे गटाचे आमदारांवर खळबळजनक आरोप केले आहेत. संतोष बांगर, तानाजी सावंतांच्या कुटुंबातील व्यक्तींची घायवळला मदत झाली असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. घायवळ अहमदाबाद एअरपोर्टवरून पळून गेला. त्याला सोडायला कोण गेले याची आपल्याकडे माहिती आहे. राम शिंदेंनी बाजार समिती निवडणुकीसाठी घायवळचा उपयोग केला. तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर राम शिंदे किंवा थेट गृहमंत्र्यांचाच दबाव असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केला.
रोहित पवार हे दादा म्हणायच्या लायकीचे नाहीत, रोहित पवारासारखा आमदार आपल्याला नको, आपल्याला भूमिपूत्र पाहिजे, असे या व्हिडीओमध्ये घायवळ बोलताना दिसत आहे, दरम्यान आता या व्हिडीओमुळे शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, दुसरीकडे निलेश घायवळ याचा राम शिंदे यांच्या पाया पडतानाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. त्यामुळे येत्या काळात शिंदे यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर राम शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सचिन घायवळ याच्या शस्त्र परवाना प्रकरणात विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे, त्यातच आता हा व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून या प्रकरणात काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.