Ajit Pawar Rohit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Rohit Pawar on Ajit Pawar : रोहित पवार काकांच्या आठवणीत विधानसभेतच हमसून हमसून रडले; भर सभागृहातूनच अजितदादांना दिला शब्द

Ajit Pawar condolence motion News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक आमदारांनी अजित पवार यांच्या शोकप्रस्तावर भाषण करून त्यांना आदरांजली अर्पण केली.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत सोमवारी (23 फेब्रुवारी) विधिमंडळात शोकप्रस्ताव मांडण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक आमदारांनी अजित पवार यांच्या शोकप्रस्तावर भाषण करून त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी काही सदस्यांना त्यांच्या भावनाही अनावर झाल्या. शोक प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार विधानसभेतच हमसून हमसून रडले.

काका अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आठवणींना उजाळा देताना आमदार पुतण्या रोहित पवार हे भावूक झाले होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यासोबतचे त्यांचे संबंध, विविध प्रसंग, किस्से सांगितले. यातच पुतण्या म्हणून अजित काकांनी शिकवलेले वक्तशीरपणाच्या काही गोष्टीही सांगितल्या. अजितकाका केस काप म्हणून सतत ओरडायचे, वजन कमी कर म्हणून सांगायचे. शर्टचे पहिले बटण लावत जा असेही ते सतत सांगत असायचे, असे ते म्हणाले.

रोहित पवार म्हणाले, अजितकाका केस काप म्हणून सतत ओरडायचे. आता अजितदादांच्या निधनानंतर केस कापले होते. आता असेच केस कमी ठेवणार आहे. अजितदादा सतत म्हणायचे शारिरीक वजन कमी कर, राजकीय वजन वाढवं, त्यानुसार शारिरीक वजन कमी करणार असल्याचा शब्द सभागृहातच त्यांनी दिला. अजितदादा मला नेहमीच शर्टाचे वरचे बटण लाव म्हणूनही सांगायचे, पण ते बटण मात्र लावणार नसल्याचे रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सांगितले.

मी हे बटन 40 ते 50 वर्षानंतर भेट झाल्यानंतरच लावेन. तोपर्यंत मात्र तुम्हची आठवण कायम राहावी, म्हणून काका मी शर्टचे वरचे बटन लावणार नसल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच यावेळी बोलताना काकी म्हणजेच सुनेत्रा पवार यांच्या मदतीला मी कायम उभा असेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

40 ते 50 वर्षानंतर ज्यावेळेस अजितकाकांची अन् माझी भेट होईल, त्यावेळेस आम्ही व अख्खा महाराष्ट्र लढत असलेला हा लढा पाहून अजितकाकांसमोर मी ताठ मानेने उभा राहीन. त्यावेळी नक्कीच माझे काका माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणतील 'लढलास बरं का' त्यामुळे या गोष्टी ऐकण्यासाठीच हा छोटासा पण महत्त्वाचा असलेला लढा हातात घेतला असून तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या अपघातास जो कोणी दोषी असेल, जबाबदार असेल त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय अन् शिक्षा दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. तो कितीही मोठा असेल कोणीही असेल तर आम्ही घाबरणार नाही, असा निर्धार रोहित पवार यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT