

Amit Shah Naxal policy : माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा, जहाल नेता थिप्परी तिरुपती ऊर्फ देवजी यानं शरणागती पत्कारली आहे. याशिवाय केंद्रीय समिती सदस्य मल्लाराजी रेड्डी ऊर्फ संग्राम याच्यासह आणखी 15 पेक्षा अधिक सशस्त्र नक्षलवाद्यांनी तेलंगाना पोलिसांपुढे शरण आलेत.
याबाबत अजून तरी अधिकृत घोषणा नसली, तरी जहाल माओवादींनी शरणागती पत्कारल्यावरून सत्ताधारी एकमेकांचं अभिनंदन करत आहे. यातच शिवसेना मुख्य नेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप नेता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या समाज माध्यम खात्यावर पोस्ट शेअर केली. त्यात जहाल माओवादी थिप्परी तिरुपती ऊर्फ देवजी याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. महाराष्ट्र, तेलंगण राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात माओवादी शस्त्रत्याग करत आहेत, याकडे उपमुख्यमंत्री शिंदेंनी लक्ष वेधलं.
देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवादाचा (Naxal) बिमोड करण्याचा निर्धार केला आहे, त्यातील हे महत्त्वाचे पाऊल आहे. अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस आणि महाराष्ट्र नक्षलमुक्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या सर्व सुरक्षा यंत्रणांचेही एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अनेकवेळा दावा केला आहे की 31 मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षल चळवळ संपुष्टात आणली जाईल. त्या दृष्टीकोनातून देवजींचं आत्मसमर्पण ही एक मोठी घटना मानली जात आहे. कोरुटलामधील थिप्परी तिरुपती ऊर्फ देवजी जन्म जगतियाल जिल्ह्यातील एक दलित कुटुंबातला आहे. तो 1980 च्या दशकात करीमनगरमधील एसआरआर महाविद्यालयात बीएससी करत असताना विद्यार्थी राजकारणात आले.
महाविद्यालयात असताना विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या संघर्षानंतर ते भूमिगत झाले. थिप्परी तिरुपती ऊर्फ देवजी करीमनगर भागात सक्रिय होते. ते एका कट्टरतावादी विद्यार्थी संघटनेत सहभागी झाला होता. 1981-82 मध्ये, रायथु कुल्ली संगमनं एक विशाल सभा घेतली होती. त्यावेळेस ती एक ऐतिहासिक सभा होती. त्याचं आयोजन तिरुपती ऊर्फ देवजी केलं होतं. नंतर 1983-84 मध्ये पक्षानं त्याला दंडकारण्यात पाठवलं.
देवजीने जवळपास 15 वर्षे गडचिरोलीत काम केलं. देवजी 1990 च्या दशकाच्या मध्यापर्यंत पक्षाच्या उभारणीच्या प्रक्रियेत कार्यरत होते. नंतर तो सशस्त्र गटाकडे वळला. माओवादी 1996 च्या जवळपास दंडकारण्यात त्याने पहिली सशस्त्र प्लॅटून तयार केली. या प्लॅटूनचा पहिला कमांडर झाला.
2001 मध्ये तो पक्षाच्या केंद्रीय समितीचा सदस्य झाला. याचबरोबरच, देवजी सेंट्रल मिलिटरी कमिशन (सीएमसी) चा सदस्यही झाला. त्याने माओवादी पार्टीमध्ये संजीव, चेतन, सुदर्शन आणि रमेश अशा वेगवेगळ्या नावांनी काम केलं. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांवर झालेल्या अनेक मोठ्या हल्ल्यांमध्ये देवजीची प्रमुख भूमिका राहिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.