FIR against BJP leader : एकाच वेळी भाजप आमदारासह 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; राजकारणात मोठी खळबळ! नेमकं प्रकरण काय?

BJP MLA legal trouble : भाजप आमदारावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकं प्रकरण काय आहे, आरोप काय आहेत आणि राजकीय प्रतिक्रिया काय आहेत, जाणून घ्या सविस्तर माहिती.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

एकाच वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूलाल मरांडी यांच्यासह सुमारे 100 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यात नगर निकाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत ही कारवाई करण्यात आली आहे.

ही तक्रार फ्लाइंग सर्विलांस टीमकडून (FST) नोंदवण्यात आली. शनिवारी रात्री टाउन पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपानुसार, संध्याकाळी 5 नंतर प्रचाराची मुदत संपल्यानंतरही एका हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली जात होती. निवडणूक नियमांनुसार प्रचार संपल्यानंतर कोणत्याही प्रकारची सार्वजनिक सभा किंवा राजकीय बैठक घेण्यास मनाई असते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली.

BJP
Kunbi Certificate : मनोज जरांगेंनी मुंबई वेठीस धरलेल्या आंदोलनातून 'मराठा' समाजाची निराशा : फक्त 74 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप

आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबतची तक्रार मिळाल्यानंतर तपास करून FIR दाखल करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रचाराचा अधिकृत कालावधी संपल्यानंतरही संबंधित ठिकाणी राजकीय स्वरूपाची बैठक सुरू असल्याचे आढळून आले. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार कारवाई करण्यात आली.

राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, मतदानाच्या 48 तास आधी कोणतीही सार्वजनिक सभा घेणे, आयोजित करणे किंवा त्यात सहभागी होणे प्रतिबंधित आहे. झारखंड नगर निकाय निवडणूक व निवडणूक याचिका नियम, 2012 मधील कलम 127 तसेच जनप्रतिनिधित्व कायदा, 1951 मधील कलम 126 नुसार ही तरतूद लागू होते. राज्यातील 48 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शनिवारी संध्याकाळी 5 पासून हा नियम अंमलात आला होता. या पार्श्वभूमीवर झालेल्या कथित बैठकीमुळेच हे प्रकरण समोर आले.

दरम्यान, या आरोपांवर प्रतिक्रिया देताना बाबूलाल मरांडी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, ते हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते आणि तेथे राजकीय बैठक आयोजित केली नव्हती. एखादा राजकीय नेता कुठेही जेवणासाठी गेला तर समर्थक आपोआप एकत्र येतात, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे हे जाणीवपूर्वक नियमभंग नसल्याचा त्यांचा दावा आहे.

BJP
Pune district news : पुणे जिल्ह्यात 2 नव्या ग्रामपंचायतींची निर्मिती : ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणीला यश, आता निवडणुकीचे वेध

या घटनेमुळे झारखंडमधील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर टीका केली जात असून, निवडणुकीच्या तोंडावर अशा कारवाईमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका 23 फेब्रुवारी रोजी होणार असून मतमोजणी 27 फेब्रुवारीला केली जाणार आहे. या निवडणुका अधिकृत पक्षचिन्हांवर लढवल्या जात नसल्या तरी विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा उमेदवारांना असतो. त्यामुळे या प्रकरणाचा निवडणुकीवर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com