chhagan bhujbal, rupali chakankar  Sarkarnama
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal statement: राजीनाम्यानंतर चाकणकरांना आणखी एक मोठा धक्का, मंत्री भुजबळांनी सांगितले, 'प्रदेशाध्यक्षपद...'

Ashok Kharat case News : रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना त्या पदावरुन सुद्धा हटवणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना छगन भुजबळ यांनी मोठे विधान केले आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : भोंदूबाबा अशोक खरात यांच्यासोबतचे फोटो व व्हिडिओ समोरआल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात असल्याने अडचणीत वाढ झाली होती. त्यासोबतच अशोक खरात यांच्या संस्थांवर रुपाली चाकणकर होत्या. या टीकेनंतर चाकणकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी चाकणकर यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी रात्री उशीरा त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यातच आता रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना त्या पदावरुन सुद्धा हटवणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना छगन भुजबळ यांनी मोठे विधान केले आहे.

रुपाली चाकणकर (Rupali Chakanakar) यांच्यावर विरोधकांकडून टीका झाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यावरील टीकेची धार कमी होईल असे वाटत होते. मात्र, त्यांच्या पदाचा राजीनामा त्वरित का घेतला नाही? अशी टीका केली जात आहे. त्यासोबतच आता विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजनीमा कधी घेतला जाणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

त्यातच पत्रकारांनी मंत्री छगन भुजबळ यांना चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना त्या पदावरुन सुद्धा हटवणार का? असा प्रश्न विचारला होता. यावर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, 'महिला आयोग अध्यक्ष हे शासकीय पद आहे. आयोगाचा संबंध राज्य सरकारशी येतो. यात मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या बरोबर चर्चा करुन उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे. आता महिला प्रदेशाध्यक्षपद या बाबत निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाला आहे. त्यात शासन येत नाही. आता त्या बाबतीत काय करायचे? हे पक्षश्रेष्ठी आणि सुनेत्राताई सर्व मंडळी बसून ठरवतील, असे स्पष्ट केले.

त्यासोबतच यावेळी रुपाली चाकणकर यांचा लगेच राजीनामा घेतला का नाही? यावरही छगन भुजबळ म्हणाले, 'एखादा आरोप झाल्यानंतर त्यात किती तथ्य आहे हे समजून घेतलं पाहिजे. सुनेत्राताईंना आम्हाला अनेक काम असतात. त्यातून हे सर्व पहायचं असते. सत्यता तपासल्याशिवाय राजीनामा घेणे योग्य ठरत नाही. माहिती घेतली असेल. चर्चा झाली असेल. हे महत्वाचे पद आहे.'

अशोक खरात यांच्याकडे बरीच मोठमोठी मंडळी येत होती. रुपाली चाकणकर पुण्याच्या त्यांना काय माहित? त्यांना सुद्धा तिकडे कोणीतरी नेले असणार आहे. पण राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये असलेल्या लोकांनी या सगळ्याच्या बाबतीत मला असे वाटते की, काही सीमा आखून ठेवल्या पाहिजेत. कारण आपण जे करतो त्याचा परिणाम जनतेवर होतो. कारण आपण नेते आहोत. मंत्री जातात मग आपण जायला काय हरकत आहे? असे काही जणांना वाटते, असेही छगन भुजबळ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT