

Rupali Chakankar Resigns: अशोक खरात प्रकरणात सातत्यानं आरोप होत असल्यानं रुपाली चाकणकर यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चाकणकरांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती साम टीव्ही न्यूजनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.
लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक झालेल्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु अशोक खऱात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचं नाव आल्यानं त्या अडचणीत सापडल्या होत्या. सातत्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांसह सोशल मीडियातून सर्वसामान्य नागरिकांकडूनही होऊ लागली होती. त्याच भाजपच्या काही आमदार आणि नेते मंडळींनी देखील चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. यापार्श्वभूमीवर आज संध्याकाळी रुपाली चाकणकर यांनी आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांची भेट घेतली. तसंच या दोन महत्वाच्या भेटीनंतर चाकणकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा देण्याच्या सूचना केल्या असल्याचं सुत्रांकडून कळतं आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतल्यानंतर भेटीमध्ये काय चर्चा झाली? याबाबत माहिती देणारं ट्विट स्वतः चाकणकर यांनी केलं. यामध्ये त्यांनी म्हटलं की, "आज मुंबई इथं पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला आयोगाच्यावतीनं पत्र दिलं. या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी व आरोपीवर कारवाई होण्याकरता आपल्या स्तरावरून निर्देश देण्याबाबत सांगितलं"
दरम्यान, शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक झालेला स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु जो स्वतःला कॅप्टनं म्हणून संबोधायचा त्या अशोक खरातला पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. त्याच्याजवळून पोलिसांना तब्बल १०० हू्न अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केले आहेत. या अशोक खरातच्या विविध कार्यक्रमात रुपाली चाकणकरांनी उपस्थिती लावल्याचं तसंच खरातच्या धार्मिक संस्थेवर चाकणकर या विश्वस्त म्हणून काम करत असल्यानं त्या टार्गेटवर आल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.