Sambhajiraje Chhatrapati Sarkarnama
महाराष्ट्र

SambhajiRaje News : शिवरायांचा पुतळा कोसळल्याने संभाजीराजेंचा संताप; म्हणाले,'...यासारखी दुर्दैवी बाब नाही!'

Sachin Waghmare

Kolhapur News : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने राज्यभरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने बांधकाम विभागाचे कार्यालय आमदार वैभव नाईक यांनी फोडले आहे.

या पुतळ्याची निगा राखण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केला आहे. त्यानंतर या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही, असे म्हणत माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली.

पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला आहे. मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार.

आता त्याठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊदे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे, असे ट्विट माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी केले आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी देखील या घटनेनवरुन सरकारवर टीका केली आहे. ‘दैवत देखील कळत नाही. त्यांच्या पुतळ्याच्या देखील भ्रष्टाचार केला आहे. यात मोदींनी उद्घाटन केले म्हणून त्यांचा दोष नाही. महापुरुषांच्या पुतळ्याच काम असे व्हायला नको. यांना कायमची अद्दल घडवायला हवी. हे स्मारक बांधणाऱ्यांना जेलमध्ये टाका.' अशी मागणी त्यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT