Girish Mahajan Sarkarnama
महाराष्ट्र

Shiv Sena MLA controversy: CM फडणवीसांचा एकेरी उल्लेख भोवला : मंत्री महाजनांनी शिंदेंच्या आमदाराला झापलं; थेट 'शेवटच्या टर्मचा इशारा'

Devendra Fadnavis remark News : राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार उद्या रात्री बंद होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षाकडून प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे.

सरकारनामा ब्युरो

Sangali News : राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार उद्या रात्री बंद होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षाकडून प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता सांगलीतील प्रचार सभेवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. बाबर यांच्या या वक्तव्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी चांगलेच झापले असून थेट इशाराच दिला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख केला होता. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सुहास बाबर यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणं चुकीचं आहे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं. तसेच सुहास बाबर यांच्या भाषेवरुन एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज द्यावी, अशी भूमिका गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी म्हटलं आहे. तसेच आपली पहिली टर्म आहे, ती शेवटची ठरु नये, असा इशारा देखील गिरीश महाजन यांनी दिला आहे. सुहास बाबर ज्या भाषेत बोलतायत ते चुकीचे आहे. त्यांची पहिलीच टर्म असून ती शेवटची ठरू नये याची काळजी घेतली पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला आहे.

बाबर यांच्या बोलण्याचे मला आश्चर्य वाटले ते मुख्यमंत्र्यांना एकेरी बोलत आहेत, असे गिरीश महाजन म्हणाले. पहिलीच वेळ आहे, मीच पक्ष चालवतो, असे सगळे बोलत आहेत. त्यांचे विधान चुकीचे आहे. राजकारणाची सुरुवात आहे, वर्षभरापूर्वी निवडून आले आहेत. लहान आहेत नवीन आहेत, राजकारण समजून घ्यावे. त्यांनी तोलून मापून बोलले पाहिजे, नाहीतर शेवटची टर्म ठरु नये, असेही महाजन म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करण्याचा प्रकार चुकीचा आहे. सुहास बाबर यांच्या भाषेवरुन एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज द्यावी, आपली पहिली टर्म आहे, ती शेवटची ठरु नये, असा देखील इशारा गिरीश महाजन यांनी सुहास बाबर यांना दिला आहे. बाबर यांच्या या वक्तव्यावरून येत्या काळात महायुतीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT