Chandrapur Congress Crisis : 'ते' नगरसेवक धानोरकर की वडेट्टीवारांचे ? चंद्रपूरमध्ये वाद वाढला, सत्ता जाण्याच्या भीतीने काँग्रेसमध्ये अस्वस्थता

Chandrapur Mayor Politics : चंद्रपूरमध्ये वडेट्टीवार आणि धानोरकर गटातील संघर्ष तीव्र झाला असून नगरसेवकांना धमक्या, पोलिस तपास आणि महापौरपदावरून सुरू असलेल्या वादामुळे काँग्रेसची सत्ता धोक्यात आली आहे.
Congress leaders and corporators in Chandrapur amid rising tensions as internal factionalism and alleged threats intensify ahead of the mayoral election.
Congress leaders and corporators in Chandrapur amid rising tensions as internal factionalism and alleged threats intensify ahead of the mayoral election.Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : चंद्रपूर शहरातील काँग्रेसच्या नगरसेवकांना अडवून धमक्या देण्यात आल्या. त्यांना आपल्या गटात यावे यासाठी दबाव टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. आता धमक्या कुठल्या गटाच्या नगरसेवकाला देण्यात आल्या यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांचे कार्यकर्ते एकमेकांवर आरोप करीत आहेत.

हे प्रकरण आता पोलिसांकडे गेले असून तपास सुरू आहे. त्यामुळे चंद्रपूरमध्ये काँग्रेसची अडचण वाढली आहे. दोन नेत्यांमधील वाद असेच सुरू राहिले तर चंद्रपूरमध्ये सत्ता जाण्याचा धोका असल्याने काँग्रेसमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. समृद्धी समृद्धी महामार्गावर काँग्रेसच्या नगरसेवकाची बस थांबवून त्यांना धमकावण्यात आले, हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी चाकू,तलवार, बंदूक असल्याची माहिती मिळाली पोलिस या प्रकरणी तपास करत असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

या घटनेमागे कोण होतं, कोणी हल्ला केला याबाबत अधिकची माहिती नाही पण पोलिस याबाबत तपास करत असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यात महापौरपदावरून वाद सुरू आहे. महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर वडेट्टीवार आपल्या समर्थक नगरसेवकांना नागपूरला घेऊन आले होते

त्यावरून वाद आणखीच वाढला होता. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या 13 नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन करून वडेट्टीवारांना अडचणीत आणले होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी झूम मीटिंग घेऊन दोन्ही नेत्यांमधील वादावर तोडगा काढला. महापौरपद खासदारांच्या समर्थकांना तर स्थायी समितीचे सभापतीपद वडेट्टीवार गटाला देण्याचे ठरले होते. दोघांनीही हा समझोता मान्य केला होता.

Congress leaders and corporators in Chandrapur amid rising tensions as internal factionalism and alleged threats intensify ahead of the mayoral election.
'बहुमत तरीही सत्तास्थापन होईना' भाजप आमदाराचा Congress ला चिमटा Parinay Fuke, Chandrapur Election

मात्र बहुमतासाठी काँग्रेसला 6 मतांची गरज आहे. त्याची जबाबदारी प्रतिभा धानोकर यांनी उचलली आहे. असे असताना अतिरिक्त नगरसेवक गोळा करण्याऐवजी काँग्रेसच्या नगरसेवकांनाच पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. दोन नेत्यांच्या भांडणात काँग्रेसची सत्ता जाणार असल्याची भीतीही वर्तविली जात आहे.

Congress leaders and corporators in Chandrapur amid rising tensions as internal factionalism and alleged threats intensify ahead of the mayoral election.
Chandrapur Politics : काँग्रेस कर्मानं सत्ता घालवणार? वडेट्टीवार मातोश्रीवर अन् धानोरकर दिल्लीला जाताच मुनगंटीवार लागले कामाला

आता धमक्या देणारे आणि पळवण्याचा प्रयत्न करण्यात आलेले नगरसेवक नेमके कोणाचे यावरून वादविवाद वाढला आहे. धमक्या देणारे कार्यकर्ते प्रतिभा धानोरकर यांचे असल्याचा आरोप केला जात आहे तर वडेट्टीवारांनी आपल्या समर्थक नगरसेवकांना धमकावण्यात आला असल्याचा दावा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com