Sanjay Raut on Maharashtra Legislative Assembly violence  Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut speech : राज्य सरकारच्या विरोधात बोलले तर जेलमध्ये टाकले जाते; संजय राऊत यांची टीका

Sanjay Raut criticizes state government News : हिंदी सक्तीच्या विरोधात राज व उद्धव ठाकरे हे एकत्र आले आहेत. त्यामुळे येत्या काळात मराठी माणसांनी एकत्रित राहिल्यास राज्याचे राजकारण मराठी माणसाच्या हाती राहिल, असा आशावाद उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : महाराष्ट्राचे राजकारण मराठी माणसाच्या हातीच राहिले पाहिजे. त्यासाठी मराठी माणसांनी जागरूक राहिले पाहिजे. हिंदी सक्तीच्या विरोधात राज व उद्धव ठाकरे हे एकत्र आले आहेत. त्यामुळे येत्या काळात मराठी माणसांनी एकत्रित राहिल्यास राज्याचे राजकारण मराठी माणसाच्या हाती राहिल, असा आशावाद उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. त्यासोबतच राज्य सरकारच्या विरोधात बोलले तर जेलमध्ये टाकले जाते, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

शेकापचा 78 वा वर्धापन दिन यंदा पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी शेतकरी, कामगार वर्ग जोवर टिकवू, तोवर महाराष्ट्र आपल्या हाती असल्याचे स्पष्ट केले. राज्यातील निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले नाही त्याचे कारण वेगळे असल्याचे राऊत म्हणाले.

विशेष म्हणजे या शेकापच्या या मेळाव्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मंचावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी एकाच मंचावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि राज ठाकरे एकाच मंचावर बाजू-बाजूला बसल्याचे पाहायला मिळाले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली.

दरम्यान, सध्याचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण फारसं वेगळं नाही अशा शब्दात महाराष्टर नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टिप्पणी केली. यावेळी त्यांनी त्यांच्या मिश्कील शैलीत भाषण करत राज्यातील सध्याच्या राजकारणावरून टोला लगावला.

प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करत असतो. मग आम्ही का नाही करायचा. रायगडमध्ये कोण येते आणि जमिनी विकत घेते माहीत नाही. उत्तरेतील अनेक धनदांडगे आहेत, ज्यांनी कोकणात जमिनीच्या जमीनीच विकत घेत आहेत. आमचेच लोक घेत आहेत. लोकांना कळत नाही की यातून आम्हीच संपणार आहोत, असेही राज ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT