Sanjay Raut : गेल्या दोन दिवसापासून दिल्लीत मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे दिल्लीतील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच नव्या संसद भवनाला गळती लागल्याची माहिती समोर येत आहे.. यामुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारला चांगलच धारेवर धरले आहे.
नवीन संसदेच्या (Parliament) इमारतीच्या लॉबीमध्ये गळती झाली. तर आवारात पाणी शिरले आहे. संसदेतील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहे. संसदेच्या नवीन इमारतीत पाणी साचण्यावरुन काँग्रेसने प्रश्न उपस्थित करत ही नोटीस दिली आहे. काँग्रेस (Congress) खासदारांनी हे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.
संजय राऊत यांनी संसदेत पाणी साचल्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. "नवीन संसद स्विमिंग पूल बनला आहे. जुनी पार्लमेंट सुस्थितीत आहे. ती अजून अनेक वर्षे चालली असती. राम मंदिर (Ram Mandir) देखील लीक होत आहे. प्रभू श्रीरामाला बसवला आहे पण वरून पाणी गळत आहे. एअरपोर्टवर देखील पाणी गळत आहे. संसदेत सगळीकडे पाणी गळत आहे.' सरकार कुठे आहे? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
'दिल्लीमध्ये बेसमेंटमध्ये पाणी गेलं तीन मुलांचा मृत्यू झाला सगळीकडे पाणीच पाणी आहे. तसेच जे सरकार आपल्या पार्लमेंटमध्ये पाणी येण्यापासून थांबू शकत नाही. अजून एक वर्ष देखील झालं नाही आहे. जो हिशोब ठेकेदारांनी दिला आहे तो हिशोब परत झाला पाहिजे. ठेकेदार कोण होते. कोणाला किती कमिशन मिळाले याचा हिशोब झाला पाहिजे, असे म्हणत राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.