Uddhav Thackeray- Sanjay Raut
Uddhav Thackeray- Sanjay RautSarkarnama

ShivsenaUBT News : ...म्हणून न्यायालयानं उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना ठोठावला दंड

Uddhav Thackeray And Sanjay Raut : मुंबई सत्र विशेष न्यायालयाने बुधवारी माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना एकत्रित दोन हजार रुपये दंड ठोठावून तो दहा दिवसांत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
Published on

Mumbai News : शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे विरुद्ध शिंदे गट संघर्ष टोकाला गेला आहे.आरे ला कारेची भाषा, एकमेकांवरील टीकेची पातळी खालावत चालली आहे.दोन्ही गटांकडून डिवचण्याची एकही संधी सोडली जात नाही. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे तर भाजपसह शिंदे गटावर तुटुन पडतात. पण आता याच दोन्ही बड्या नेत्यांना न्यायालयाने दणका दिला आहे. तसेच दंडही ठोठावला आहे.

मुंबई सत्र विशेष न्यायालयाने बुधवारी (ता.1) माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत यांना एकत्रित दोन हजार रुपये दंड ठोठावून तो दहा दिवसांत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. हा दंड मानहानी खटल्यातील विलंब माफ करण्यासाठी ठोठावण्यात आला आहे.

शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)‘सामना’या मुखपत्राच्या मराठी आणि हिंदी आवृत्तीत बदनामीकारक लेख छापल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. तसेच 'सामना'वर कारवाई केली जावी अशी विनंती देखील करण्यात आली आहे.

माजी खासदार राहुल शेवाळे यांची बदनामी प्रकरणात दंडाधिकारी न्यायालयाने मानहानीच्या दाव्यातून आरोपमुक्त करण्यासाठी या दोन्ही नेत्यांकडून न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी विलंब झाल्याने दोन्ही नेत्यांनी विशेष न्यायालयात अर्ज सादर केला होता.

Uddhav Thackeray- Sanjay Raut
BJP Vs Congress : नागपुरात राजकारण पेटलं; फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण, भाजप- काँग्रेसमध्ये जुंपली

अधिवक्ता मनोज पिंगळे यांच्यामार्फत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जात 2,000 रुपये जमा करण्यास झालेला विलंब अनावधानाने होता हे स्पष्ट करतानाच,अनेक कारणे नमूद करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com