Eknath Shinde News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (बुधवारी) दिल्लीला गेले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होईल आणि मंत्रिपदाची नावे निश्चित होतील, अशी चर्चा होती. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत असताना मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र दिल्लीला गेले नाहीत.
एकनाथ शिंदे दिल्लीला न गेल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी शिंदे दिल्लीला न जाण्याचे कारण सांगितले आहे. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांचे दिल्लीला जाण्याच कोणतेही नियोजन नव्हते. आमची यादी आधीच तयार असल्याने आम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही.
भाजपाची यादी दिल्लीत ठरते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेले असतील. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात काही निर्णय बाकी असेल, असे म्हणत शिरसाट यांनी फडणवीस आणि पवार दिल्लीला जाण्याचे कारण सांगितले.
शिवसेनेत कोणाला मंत्री पदाची संधी मिळते, हा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे यांच्याकडे आम्ही सोपावला आहे. ते निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. कोणीही नाराज असण्याच काही कारण नाही. आमच्याकडे अडीच वर्षांचा कोणताही फॅामूर्ला ठरलेला नाही, असे शिरसाट यांनी सांगितले.
16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, संजय शिरसाट यांनी येत्या 13-14 तारखेला मंत्री मंडळाचा विस्तार होईल. खात्यावरुन तिन्ही महत्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. इतर कोणालाही या बद्दल माहिती नाही, असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.