Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 Sarkarnama
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 Phase 2: दुसऱ्या टप्प्यातील लढती आठ, कुणाची पडणार कुणाशी गाठ?

सरकारनामा ब्युरो

संदीप चव्हाण

Lok Sabha Election 2024 Phase 2: पाच विद्यमान खासदारांचं राजकीय भवितव्य ठरवणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) दुसऱ्या टप्प्यासाठी आज (26 एप्रिल) रोजी मतदान होत आहे. पत्ता कट झालेल्या एका विद्यमान खासदाराची पत्नी आणि पत्ता कट झालेल्या अन्य एका विद्यमान खासदाराचा मुलगा असे दोन नवे चेहरे या निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार आहेत. शिवाय 'वंचित'चे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरदेखील (Prakash Ambedkar) अकोल्यातून सलग अकराव्यांदा निवडणूक लढवत आहेत.

अशा होणार आठ मतदारसंघांतील लढती?

शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट

1. बुलडाणा - प्रतापराव जाधव विरुद्ध नरेंद्र खेडेकर

2. यवतमाळ - वाशीम - राजश्री पाटील विरुद्ध संजय देशमुख

3. हिंगोली - बाबूराव कदम कोहळीकर विरुद्ध नागेश पाटील - आष्टीकर

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप विरुद्ध काँग्रेस

1. अकोला - अनुप धोत्रे विरुद्ध अभय पाटील विरुद्ध प्रकाश आंबेडकर (वंचित)

2. अमरावती -नवनीत राणा विरुद्ध बळवंत वानखेडे

3. नांदेड - प्रतापराव पाटील चिखलीकर विरुद्ध वसंतराव चव्हाण

भाजप विरुद्ध शरद पवार गट

1. वर्धा - रामदास तडस विरुद्ध अमर काळे

रासप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट

1. परभणी - महादेव जानकर विरुद्ध संजय जाधव

तीन विद्यमान बसवले घरात; पैकी दोघांच्याच घरातले उतरवले रिंगणात!

सलग 5 टर्म खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या (Shivsena) यवतमाळ-वाशीमच्या विद्यमान खासदार भावना गवळी (Bhavana Gawali), सलग 4 टर्म खासदार राहिलेले भाजपचे अकोल्याचे विद्यमान खासदार संजय धोत्रे (Sanjay Dhotre) आणि 1 टर्म खासदार राहिलेले शिवसेनेचे हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील या तिघांचा पत्ता या वेळी कट करण्यात आला आहे. मात्र, खासदारकीचा पत्ता कट करण्यात आलेल्या तीनपैकी दोन जणांच्याच घरात खासदारकीचं तिकीट देण्यात आलं आहे.

भाजपनं (BJP)संजय धोत्रे यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना अकोल्यातून (Akola) तर शिवसेना शिंदे गटाने हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशीम येथून उमेदवारी दिली आहे. अमरावतीत 2019 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या विद्यमान खासदार नवनीत राणा या वेळी भाजपकडून निवडणूक लढवत आहेत.

वंचितला 2019 मध्ये मिळाली होती 11 लाख 37 हजार 483 मतं!

बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम (Yavatmal-Washim) या विदर्भातील 05 आणि हिंगोली, नांदेड, परभणी या मराठवाड्यातील 03 अशा एकूण 08 मतदारसंघांचा या दुसऱ्या टप्प्यात समावेश आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे 2019 च्या लोकसभेत वंचितला या आठही मतदारसंघांत मिळून तब्बल 11 लाख 37 हजार 483 इतकी मतं मिळाली होती. त्यावेळी वंचितच्या उमेदवारांनी बुलडाणा आणि परभणी येथील राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांना विजयापासून वंचित ठेवले, तर काँग्रेसचे (Congress)त्यावेळचे नांदेडचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांना घरी बसवले.

मागच्या निवडणुकीत वंचितनं अकोल्यात पावणेतीन लाखांहून जास्त मतं घेतली होती तर हिंगोली आणि नांदेडमधून (Nanded) दीड लाखांहून जास्त मतं मिळवली होती. परभणीत दीड लाखाच्या जवळपास तर यवतमाळ-वाशीमधून 55 हजारांच्या आसपास मतं घेतली होती. एकूणच काय तर या आठही मतदारसंघांतील 'वंचित फॅक्टर' पाहता मविआ आणि महायुतीसाठी हा दुसरा टप्पा खडतर असणार हे नक्की!

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT