2024 Lok Sabha Elections : विदर्भात ऊन पावसाच्या खेळात सुरू झाले मतदान !

Lok Sabha Election : विदर्भात तीव्र उन्हाळा आणि पावसाळा यांचा संगम झाल्याचे चित्र आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार तीन जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Phase 2 Elections Voting Maharashtra : लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी अर्थात आज विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काल विदर्भात वाशीम आणि अकोल्यात तीव्र उन्हाचा फटका स्थानिकांना बसला असताना आज अचानक पावसाचा अंदाज व ढगाळ वातावरण पाहता मतदान प्रक्रियेवर ऊन आणि पावसाचे सावट असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारी पडण्याची भीती राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी या 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान सुरू झाले. यासाठी एकूण 16,589 मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, या निवडणुकीत 1 कोटी 49 लाख 25 हजार 912 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण 204 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. या आठही लोकसभा मतदारसंघांत दहा वर्षांत प्रत्येक दोन ते सव्वा दोन लाख मतदार वाढले आहे. हे मतदार कोणाला आपला कल देतात याकडे उमेदवारांचे लक्ष आहे.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024
Nanded Loksabha News : नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला; भाजपच्या '400 पार'मध्ये चिखलीकर असणार का?

अकोला लोकसभा मतदारसंघ Akola Lok Sabha Election 2024 Voting Live

अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित नेते प्रकाश आंबेडकर, काँग्रेस नेते डाॅ. अभय पाटील तर भाजप युवा नेता अनुप धोत्रे यांच्यात थेट लढत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण 18,90,814 मतदार आपल्या मतदानाचा प्रयोग करतील. यंदा अकोल्याकडे संपूर्ण राज्याचे नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे अकोल्यात मतदानाची टक्केवारी ही महत्त्वाची ठरणार आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघ Amravati Lok Sabha Election 2024 Voting Live

अमरावती लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक वर वर पाहता तिरंगी वाटत आहे. पण, आतून ती दुरंगी आहे. काँग्रेस आणि भाजप आमने सामने आहे. त्यात बच्चू कडू यांची प्रहार जनशक्ती कोणाचे मते गिळंकृत करते हे पाहण्यासारखे असेल. काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे विरुद्ध भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यात थेट लढत आहे. अमरावती लोकसभा निवडणुकीत 18,36,078 मतदार कोणाला कौल देतात हे पाहण्यासारखे असेल. भाजप विरोधात काँग्रेस अशी थेट लढत अमरावती येथे आहे. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभेला आलेल्या व्यापक यश आणि बच्चू कडू यांना सायन्स स्कोअर मैदानावरून प्रशासनाने हुकूमशाही पद्धतीने हुसकावून लावण्याचा काय परिणाम अमरावतीत होतो हे पाहण्यासारखे असेल.

वर्धा लोकसभा मतदारसंघ Wardha Lok Sabha Election 2024 Voting Live

वर्धा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार भाजप नेते रामदास तडस विरोधात राष्ट्रवादीचे अमर काळे यांच्या विरोधात लढत होत आहे. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकमेव उमेदवार अमर काळे आहे. अशा वेळी या जागेवर महाविकास आघाडी काय चमत्कार करते हे पाहण्यासारखे असेल. वर्धा लोकसभा निवडणुकीत 16,82,771 मतदार कोणाला कौल देतात हे पाहण्यासारखे असेल. वर्धा मतदारसंघात 2014 मध्ये 65 टक्के व 2019 मध्ये 62 टक्के मतदान झाले होते. यंदा मतदानाच्या टक्केवारी घट होते की वृद्धी हे पाहण्यासारखे असेल.

यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघ Yavatmal-Washim Lok Sabha Election 2024 Voting Live

या ठिकाणी विद्यमान खासदार भावना गवळी यांचे तिकीट महायुतीतमध्ये शिवसेना (शिंदे गट) ने कापले. या ठिकाणी राजश्री पाटील या आयात उमेदवाराला शिवसेना (शिंदे गट) ने तिकीट दिले. या मतदारसंघात शिवसेना विरोधात शिवसेना अशीच लढत होत आहे. शिवसेना (ठाकरे गट) यांनी येथे संजय देशमुख यांना उमेदवारी दिली. यवतमाळ वाशीम लोकसभा निवडणुकीत यंदा 19,40,916 मतदार कोणाला कौल देतात हे पाहण्यासारखे असेल. वाशीम येथे आज पावसाची शक्यता पाहता मतदानावर याचा काही परिणाम होतो काय हे पाहण्यासारखे असेल.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघ Buldhana Lok Sabha Election 2024 Voting Live

बुलडाणा लोकसभा मतदारसंघात एकूण 17,82,700 मतदार आपल्या मतदानाचा प्रयोग करतील. बुलडाणा येथे दुरंगी लढत होत असून, वंचित येथे किती मतांचा डल्ला मारतो हे पाहण्यासारखे असेल. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत आहे. शिवसेना (शिंदे गट) प्रतापराव जाधव विरुद्ध शिवसेना (उद्धव ठाकरे ) नरेंद्र खेडेकर यांच्यात लढत होणार आहे, तर या ठिकाणी रविकांत तुपकर यांची भूमिका निर्णायक ठरेल.

R

Lok Sabha Election 2024
Beed Lok Sabha Election : बीडमध्ये मोठी घडामोड; जरांगेंच्या आंदोलनातला शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com