sharad pawar sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar : शरद पवारांनी रायगडावरून फुंकली 'तुतारी', म्हणाले, "महाराष्ट्राची स्थिती बदलून..."

Sharad Pawar In Raigad : शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नवीन चिन्हाचं रायगडावर अनावरण केलं आहे.

Akshay Sabale

केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाला 'तुतारी फुंकणारा माणूस' हे चिन्ह दिलं होतं. या चिन्हाचं रायगडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी शनिवारी ( 24 फेब्रुवारी ) अनावरण केलं. चिन्हाच्या अनावरणासाठी शरद पवार रायगडावर पालखीच्या माध्यमातून पोहोचले. या वेळी शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. ( sharad pawar Latest News )

पक्ष चिन्हाच्या अनावरणासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार राजेश टोपे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी शरद पवार म्हणाले, "आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अखंड राहील, असा आहे. देशात वेगळी स्थिती आहे. सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. सत्ता सामान्यांसाठी वापरण्याऐवजी राज्यांत आणि भाषेत अंतर वाढवण्याचं काम केलं जातं. त्याच्यात परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. हा एक वैचारिक संघर्ष आहे."

"देवगिरीत यादवांचं राज्य होतं... दिल्लीत मोघलाचं राज्य होतं.... पण शिवछत्रपतींचं राज्य सामान्यांची सेवा करणारे, रयतेचे आणि हिंदवी स्वराज्य होते. महाराष्ट्राची स्थिती बदलून जनतेचं राज्य आणावं लागणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार ही संघटना मजबूत करायची आहे. निवडणूक आयोगानं तुतारी चिन्ह दिलं आहे. ही तुतारी संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आहे. तुमच्या कष्टातून, शौर्यातून, त्यागातून यश मिळेल," असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT