Gulabrao Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Political controversy : शरद पवार यांच्या खासदाराचा पलटवार; म्हणाले, 'लक्ष्मीचे दर्शन करा पण मतदान आम्हालाच करा'

Sharad Pawar MP statement News : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका प्रचार सभेवेळी वादग्रस्त वक्तव्य केले होते.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका प्रचार सभेवेळी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार भास्करराव भगरे गुरुजी यांनी जोरदार पलटवार केला आहे.

मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एका सभेप्रसंगी बोलताना १ तारखेला भरपूर लक्ष्मी येणार आहे. त्यामुळे एक तारखेला रात्री नागरिकांनी घरासमोर झोपा, असा सल्ला दिला होता. त्यासोबतच त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळातही मोठ्या प्रमाणात लक्ष्मी वाटली गेली असल्याचे विधान केले होते. या वक्तव्याचा संदर्भ घेत खासदार भगरे यांनी थेट टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांनी राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अलीकडच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार केला आहे. गुलाबराव पाटील यांनी १ तारखेला भरपूर लक्ष्मी येणार तसेच विधानसभा निवडणुकीच्या काळातही मोठ्या प्रमाणात लक्ष्मी वाटली गेली, असे विधान केले होते. या वक्तव्याचा संदर्भ घेत खासदार भगरे यांनी थेट टीकास्त्र सोडले.

प्रचारसभेवेळी गुलाबराव पाटील यांच्या विधानाचा समाचार घेताना खासदार भगरे म्हणाले, 'निवडणूक काळात जर लक्ष्मी दर्शन होत असेल तर दर्शन करून घ्या. कारण देणाऱ्यांकडे आलेली संपत्ती ही त्यांची कष्टाने मिळवलेली नाही. ती संपत्ती तुम्हीच घ्या आणि मतदान मात्र आपल्या उमेदवारांनाच करा, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

दरम्यान, चार दिवसापूर्वीच प्रचार सभेवेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप-शिंदे गटाकडून निवडणुकांमध्ये लक्ष्मीवाटप होत असल्याचे विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले होते. त्यातच आता खासदार भगरे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. त्यामुळे येत्या काळात वातावरण चांगलेच तापणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT