Congress Trouble : निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का, जिल्हाध्यक्षाचा राजीनामा; पदाधिकाऱ्यांनीही सोडली साथ!

Congress Sachin Pote Resigns : निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी राजीनामा दिला आहे.
Congress district president Sachin Pote resigns, stirring political discussion in Kalyan-Dombivli.
Congress district president Sachin Pote resigns, stirring political discussion in Kalyan-Dombivli.sarkarnama
Published on
Updated on

Kalyan-Dombivli Politics : स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत नगरपंचाय आणि नगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारी करत आहेत. मात्र, या निवडणुकीच्या तयारी दरम्यान काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कल्याण-डोंबिवलीत काँग्रेसची मर्यादीत ताकद आहे. मात्र, काँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या जिल्हाध्यक्षानेच राजीनामा दिला आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक सचिन पोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाला सादर केला आहे. पोटे यांच्या पाठोपाठ त्यांच्या समर्थक आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांनी देखील आपआपले राजीनामे पक्षाकडे दिले आहेत.

राजीनाम्यानंतर सचिन पोटे हे कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा सुरू असताना त्यांनी आपल्या राजीनाम्याचे कारण वेगळेच असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार दिला आहे. ‘नव्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळावी म्हणून मी पद सोडले असून हा नाराजीचा निर्णय नाही.

आपल्या पुढील वाटचालीविषयी सांगताना ते म्हणाले, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, हर्षवर्धन सपकाळ आणि संजय दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल काँग्रेसमध्येच राहणार आहे.

Congress district president Sachin Pote resigns, stirring political discussion in Kalyan-Dombivli.
Shivsena UBT : 'मुंबईवर भाजपच्या दिल्लीकर नेतृत्वाची सुरुवातीपासूनच वाईट नजर, PM मोदींच्या मंत्रिमंडळात 'बॉम्बे'ची चाटूगिरी करणारे मंत्री बसलेत...'

भाजपकडून ऑफर?

पोटे यांनी आपण काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे सांगितले असले तरी राजकी वर्तुळात ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपाकडून ही त्यांना ऑफर देण्यात आली आहे. दरम्यान, पोटे यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसच्या निवडणूक तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महापालिका निवडणुकीपूर्वी पक्षाला संघटनात्मक आघाडीवर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांची यादी

सचिन पोटे – जिल्हाध्यक्ष

लिओ मॅकेनराय – उपाध्यक्ष

विमल ठक्कर – ब्लॉक अध्यक्ष

शकील खान – ब्लॉक अध्यक्ष

प्रविण साळवी – ब्लॉक अध्यक्ष

मनिषा सर्जिने – ब्लॉक अध्यक्ष, कल्याण पूर्व

अशोक कापडणे – ब्लॉक अध्यक्ष

सचिन भटेवरा – ब्लॉक अध्यक्ष

Congress district president Sachin Pote resigns, stirring political discussion in Kalyan-Dombivli.
Local Body Elections : उत्तर महाराष्ट्रातील दोन ठिकाणच्या निवडणुकांना आयोगाकडून स्थगिती, समोर आलं मोठं कारण..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com