Sharad Pawar  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra MLC Election : विधान परिषदेच्या तोंडावर शरद पवारांचा मोठा डाव; ठाकरेंची शिवसेना एकाकी; काँग्रेसच्या निर्णयाने तापले राजकीय वातावरण!

MLC Election News : राज्यातील पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघातील तर पुणे, नागपूर व मराठवाडा पदवीधरच्या तीन अशा एकूण पाच मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीत सरळ लढत होत आहे. मात्र, या निवडणुकीत जागावाटपामुळे सर्वच पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. त्यामुळे त्याचा फटका बसला आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी झाली असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतापसिंह पाटील तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून दिलीप घुगे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे महाविकास आघडीचा अधिकृत उमेदवारावरून पेच निर्माण झाला होता. मात्र, याठिकाणी निवडणुकीपूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठा डाव टाकला आहे. त्यामुळे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी राष्ट्रवादीच्या प्रताप पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्याने उद्धव ठाकरेंची शिवसेना एकाकी पडली असल्याचे चित्र आहे.

राज्यातील पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघातील तर पुणे, नागपूर व मराठवाडा पदवीधरच्या तीन अशा एकूण पाच मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, यातील अनेक मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाल्याचे पहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी एकाच मतदारसंघातून महाविकास आघाडीचे दोन उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातही असेच चित्र पहायला मिळत आहे, या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar ) पक्षाचा उमेदवार असताना देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उमेदवार दिला आहे.

दरम्यान, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातही महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना (Shivsena) आमने-सामने आली आहे. या पदवीधर मतदारसंघात काँग्रेस काय भूमिका घेणार? महाविकास आघाडीमध्ये नेमका कोणाला पाठिंबा देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले होते.

काँग्रेसने आपली भूमिका जाहीर केली आहे. काँग्रेसकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे जालन्याचे खासदार कल्याण काळे यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT