Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड; पाच उमेदवारांविरोधात अपात्रतेची याचिका

Independent candidate Anil Kale moves court seeking disqualification of five rivals in the Amravati teacher constituency election, citing alleged code violations : काँग्रेस आणि महायुतीच्या उमेदवारांसह तीन अपक्षांविरोधात आक्षेप; आचारसंहिता उल्लंघन आणि प्रलोभने दिल्याचे आरोप.
Amravati Teacher Constituency
Amravati Teacher ConstituencySarkarnama
Published on: 
Updated on: 

Amravati Teacher Constituency Election : अमरावती विभागाच्या शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी चुरस वाढली आहे. ही निवडणूक आता न्यायालयात पोहोचली आहे.

अपक्ष उमेदवार अनिल काळे यांनी पाच प्रतिस्पर्धी उमेदवारांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार आणि प्रतिस्पर्धी अपक्ष तीन, अशा पाच उमेदवारांविरोधात ही याचिका दाखल केली आहे.

महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या (Congress) उमेदवार आदिती पोहरे यांनी प्रत्यक्षात प्राध्यापक पदावर नसतानाही आपल्या नावापुढे प्राध्यापक ही पदवी वापरल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. त्यांचे निवडणूक एजंट असलेले कॉलेजचे प्राचार्य निवडणूक एजंट होण्यासाठी अपात्र असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.

महायुतीचे (Mahayuti) उमेदवार किरणराव सरनाईक यांच्याकडे कोणतीही अधिकृत पात्रता नसताना आपल्या नावापुढे 'ॲडव्होकेट', ही पदवी वापरत असल्याचा आणि मतदारांना प्रत्येकी दोन हजार रुपये आणि पैठणी साड्या वाटल्याचाही आरोप आहे. यासंदर्भात सीसीटीव्ही (CCTV) आणि ऑडिओ रेकॉर्डिंगचे पुरावे याचिकेत जोडण्यात आले आहे.

Amravati Teacher Constituency
Amravati Teachers Constituency Election : अमरावती शिक्षक मतदारसंघात 'वंचित'ला धक्का; जाहेरोशांचा अर्ज बाद, भोयरांचा गंभीर आरोप

अन्य तीन उमेदवारांविरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. अविनाश बोर्डे यांचे नामांकन रद्द करून चौकशीची, तर सुरेश देवकर यांनी स्वतःचे छायाचित्र आणि नाव असलेले कॅलेंडर वाटप करत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप याचिकेद्वारे केला आहे. मुंबई येथील राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा निवडणूक प्राधिकारी यांनी याचिकेची दखल घेतली आहे.

Amravati Teacher Constituency
Amravati MLC Election : अमरावती 'शिक्षक'मध्ये अपक्ष ठरणार 'बाजीगर'! सरनाईक-पोहरेंमध्ये थेट लढत; कोणाचे गणित बिघडणार?

12 ऑक्टोबरला दाखल याचिकेत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघनाचा आरोप करण्यात आला आहे. मान्यताप्राप्त प्राध्यापक नसतानाही ही उपाधी वापरणे, पडताळणी न केलेल्या पात्रतेशिवाय वकील ही उपाधी वापरणे तसेच विविध प्रलोभने दाखवणे, असे आरोप याचिकेतून पाच उमेदवारांवर केल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.

मते विकत घेण्यासाठी रोख आणि पैठणी साड्या वाटण्यात येत असल्याचाही आरोप याचिकेत आहे. विशेष म्हणजे, या आरोपाची पुष्टी करण्यासाठी सीसीटीव्ही रेकाॅर्डिंग जोडण्यात आले आहे. त्यामुळे ही लढाई लांबवर चालेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या याचिकेवर संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com