New Dehali News : आगामी काळात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच भाजप व इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. या निवडणुकीच्या तोंडावरच दिल्ली दरबारी मोठी घडामोड घडल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे लागून राहिले आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन पार पडले त्यानंतर अशातच आता शरद पवार (Sharad Pawar) गटाचे खासदार अमर काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता खासदार अमर काळे यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीच्या तोंडावरच पंतप्रधांन मोदी यांची भेट का घेतली ? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. वर्धा लोकसभा मतदारसंघातीस विकास कामांबाबत अमर काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असल्याचे समोर आले आहे. अमर काळे यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर ट्वीट करत अमर काळे यांनी म्हटले की, ‘आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी वर्धा लोकसभा मतदारसंघ विकसित करण्याच्या व रोजगाराला चालना देण्याच्या दृष्टीने राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या ग्रामोद्योगाच्या विचारांवर आधारित देशातील एकमेव संस्था असलेल्या महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकिकरण संस्था (MGIRI) च्या सर्वांगीण विकासाकरिता व संस्थेच्या विस्तारीकरणाकरिता लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली.’
दरम्यान, येत्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीचा दिवाळीनंतर बार उडण्याची शक्यता असतानाच खासदार काळे यांनी पीएम मोदी यांची भेट घेतली असल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.