
Mumbai, 22 August : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत सध्या दिल्लीत जोरदार हालचाली सुरू आहेत. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर इंडिया आघाडीने आंध्र प्रदेशमधील निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना रिंगणात उतरविले आहे. दोन्ही आघाड्यांकडून मतांची जुळवाजुळव सुरू आहेत, त्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती केली अहे, त्यावर ठाकरे आणि पवार यांनी फडणवीस यांना काय सांगितले, याची उत्सुकता असतानाच त्याबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनीच भाष्य केले आहे.
राष्ट्रीय आणि राज्य महिला आयोगाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याबाबत शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्वव ठाकरे यांनी काय सांगितले, याबाबत फडणवीस यांनीच खुलासा केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोघांना मी फोन केला होता. उपराष्ट्रपतिपदाचे एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्र, मुंबईचे मतदार आहेत. आपले राज्यपाल आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या एका मतदाराला तुमच्या दोन्ही पक्षांनी समर्थन द्यावं, अशी विनंती मी या दोन्ही नेत्यांना केली आहे.
माझ्या विनंतीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘आम्ही सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल,’ असे सांगितले आहे, तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीचा उमेदवार उभा करण्याचा निर्णय झाला आहे, त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत जावं लागेल, असे उत्तर दिले आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून एक कर्तव्य समजून, तसेच महाराष्ट्रातील एक मतदार उमेदवार आहेत, म्हणून मी या दोन्ही नेत्यांना फोन केला, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
याच विषयासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या सकाळी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये भाष्य केले होते. फडणवीसांनी ठाकरे आणि पवारांना फोन केला असला तरी आम्ही इंडिया आघाडीच्या उमेदवारासोबत आहोत. इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रवादीकडून पवार, तर शिवसेनेकडून मी उपस्थित होतो, असेही स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.