Ashok Kharat case news update  Sarkarnama
महाराष्ट्र

Ashok Kharat Case: साई संस्थान कर्मचाऱ्यानं जीवन संपवलं! खरातचं नाव चार्जशीटमधून वगळलं; शिर्डी पोलिसांच्या अडचणीत वाढ

Shirdi Sai Sansthan Death Case: पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये काही महत्त्वाचे पुरावे जप्त केली आहे. या नोटमध्ये काही व्यक्तींचा थेट किंवा अप्रत्यक्ष उल्लेख असल्याची चर्चा आहे.

Mangesh Mahale

Ashok Kharat Controversy: महिलांवर अत्याचार, आर्थिक फसवणूक, जादूटोण्याच्या नावाखाली फसवणूक अशी अशोख खरात याची वेगवेगळी प्रकरणे समोर येत असताना आता चार वर्षांपूर्वीचे प्रकरण समोर आले आहे. यात त्यांचे नाव स्पष्टपणे आले आहे. शिर्डीत झालेल्या एका आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागले आहे. साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत असलेल्या विकास रामदास दिवटे (वय 37) यांच्या मृत्यूमागे संगनमत आणि दबावाचे आरोप पुढे येत आहेत.

मृतव्यक्तीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत (सुसाईड नोट) आणि कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत भोंदू बाबा अशोक खरात याचे नाव स्पष्टपणे आहे. पोलिसांनी त्याचे नाव दोषारोपपत्रातून (चार्जशीट) वगळल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. शिर्डी पोलिसांच्या त्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील संशय अधिकच गडद झाला आहे.

या प्रकरणात भोंदू ‘कॅप्टन खरात’चा थेट हस्तक्षेप असल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे. श्री साईबाबा संस्थानमधील तत्कालीन उपकार्यकारी अधिकाऱ्याला हाताशी धरून मानसिक छळ केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये काही महत्त्वाचे पुरावे जप्त केली आहे. या नोटमध्ये काही व्यक्तींचा थेट किंवा अप्रत्यक्ष उल्लेख असल्याची चर्चा आहे. मात्र, या नोटमधील मजकूर अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेला नाही. हा पुरावा समोर आल्यास प्रकरण कुठल्या दिशेने जाईल, हे सांगता येत नाही.

आत्महत्येनंतर हे संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी केला आहे. संबंधित उपकार्यकारी अधिकाऱ्याचे नाव समोर येऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तडजोड करण्यात आल्याची चर्चा आहे.

विकास दिवटे यांनी ९ जून २०२२ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं होतं. या प्रकरणात त्यांच्या भावाने तक्रार नोंदवली होती. विकास यांचे सासरे अशोक सदाफळ, मेहुणा प्रदीप सदाफळ आणि साडू विलास गवळी यांच्यासह खरातने मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले, असे तक्रारीत म्हटले होते. मात्र तरीही कोणतीच कारवाई झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

सासरच्या मंडळींनी विकास त्यांना खरातकडे नेले होते त्याठिकाणी खरातने विकास यांना 'जीवे मारण्याची' आणि 'नोकरी घालवण्याची' धमकी दिली होती. या मानसिक त्रासाला कंटाळून विकास यांनी आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेल्या सुसाईड नोटमध्येही खरातच्या त्रासाचा उल्लेख होता. घटनास्थळी पोलिसांना मृताने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली चिठ्ठीही सापडली होती, त्यात या सर्वांच्या त्रासाचा उल्लेख होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT